
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा-सुरेश ज्ञा. दावणे.. मंठा..येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.निबंध स्पर्धेसाठी – ‘मराठी भाषा संवर्धन काळाची गरज’ हा विषय देण्यात आला होता. महाविद्यालयाच्या कनिष्ठ व वरिष्ठ गटातील विद्यार्थी व विद्यार्थिंनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
निबंध स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ माणिकराव थिटे, उपप्राचार्य डॉ.सदाशिव कमळकर, डॉ. सुधाकर जाधव, प्रा.संभाजी तिडके मराठी विभाग प्रमुख प्रा. के.एम.कांबळे, डॉ.विनायक काळे तसेच सहकारी प्राध्यापक डॉ.ज्ञानेश्वर महाजन, डॉ.सुभाष वाघमारे, डॉ.दक्षता देशमुख मैडम, प्रा.चारुलता पाटील, प्रा.काकडे, प्रा.बी.एस.फासाटे, प्रा. संतोष रंजवे आदी प्राध्यापक वर्ग व कर्मचारी वृंद यांनी मोलाचे सहकार्य केले.