
दैनिक चालू वार्ता कोल्हापूर प्रतिनिधी -शहाबाज मुजावर.
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील १३ पोलिस निरीक्षकांसह तीन सहायक महत्त्वाच्या पोलिस ठाण्यांच्या प्रभारी बदलीचे आदेश झालेल्या सर्व पोलिस ठिकाणी हजर होण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक शैलेंद्र बलकवडे यांनी सोमवारी (दि. ३०) आदेश काढला. होता या आदेशानुसार अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यानुसार काल पन्हाळा पोलीस निरीक्षक म्हणून पहिल्याच महिला पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी यांनी पदभार स्वीकारला त्यांच्या स्वागतासाठी पन्हाळा प्रेस संघटना चे सर्व सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व पत्रकार यांनी गिरी मॅडम यांचा वृक्ष देऊन स्वागत केले. यापूर्वी ते कोल्हापूर येथे शहर वाहतूक नियंत्रण पोलीस निरीक्षक म्हणून काम पाहत होत्या गिरी मॅडम हे १९९७ मध्ये पीएसआय पदी रुजू झाले आहेत त्यांनी मुंबई, ठाणे , सांगली, आशा. ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक, पोलीस निरीक्षक, म्हणून काम पाहिले आहे.
गिरी मॅडम यांनी पत्रकार शी संवाद साधताना आपल्या भागात कोणती घटना घडत असताना पहिल्यादा पत्रकारांना कळते त्यामुळे पत्रकारांनी आम्हाला पहिल्यादा सांगावे आमचे सहकार्य सर्व पत्रकारांना असेल तसेच मी पन्हाळगडावर अवैद्य धंदे, बेकायदेशीर चालणाऱ्या गोष्टीवर नजर राहील व त्यांच्यावर कडक कारवाई करणार आहे असे सुद्धा त्यांनी सांगितले महिला सबलीकरण साठी शाळा, महाविद्यालय, मध्ये जाऊन प्रबोधन करणार आहे असेही त्यांनी सांगितले,
पन्हाळा प्रेस रिपोर्टस पत्रकार च्या वतीने अध्यक्ष , विक्रम पाटील बोलत असताना सांगितले की.करवीर ची राजधानी पन्हाळा आहे.ज्या पद्धतीने महाराष्ट्राचा राजकारभार महाराणी ताराबाईंनी पाहिलेला होता तसाच कारभार मॅडम नी पन्हाळगडावरून पहावा पन्हाळगडावर आसपासची अवैध्य धंदे, बेकायदेशीर चालणारा गोष्टी त्यांनी योग्य कारवाई करतील अशी आमची आशा आहे.ज्या ज्या ठिकाणी त्यांनी काम केले तिथे त्यांचे काम हे आदर्श म्हणून त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे.
यावेळी, उपनिरीक्षक रमेश ठाणेकर , पोलीस कॉन्स्टेबल बाजीराव चौगुले, जेष्ठ पत्रकार आनंद जगताप, नितीन भगवान, सचिन वरेकर, शहाबाज मुजावर, आबिद मोकाशी, पोलीस पाटील संघटना अध्यक्ष,भीमराव काशीद, अजिंक्य राऊत, आधी उपस्थित होते,