
दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी- शिवकुमार बिरादार
ता. मुखेड, खरब खंडगाव येथील ओंकारेश्वर यात्रेनिमित्त जंगी कुस्त्यांचा फड संपन्न झाला.
यावेळी गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे उद्घाटन मुखेड पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक गजानन काळे साहेब व पी.एस.आय अनासपुरे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. सोबत जमदार वाघमारे,
सरपंच प्रतिनिधी म्हणून. डॉ. रणजीत काळे, नांदेड पोलीस, अंकुश कांबळे,
इतर मान्यवर उपस्थित होते.
या कुस्तीच्या फडात , गाव, तालुका जिल्ह्यातून पैलवानाची उपस्थिती पाहायला मिळाली. सुरुवातीला लहान मुलांच्या कुस्त्या पासून सुरुवात झाली. यावर्षीचे वैशिष्ट्य असे आहे. की यात मुलींच्या कुस्तीपटूंनी सुद्धा सहभाग नोंदवला होता. वसमतच्या एका मुलीने कुस्तीत 700 रुपयाची कुस्ती जिंकून बाजी मारली. या यात्रेत ही कुस्ती वैशिष्ट्यपूर्ण ठरली.तेंव्हा इतर शेवटची कुस्ती 1500 रुपयाची झाली . कुस्तीपटूंनी अगदी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिल्याने गावातील नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद वाहत होता. यावेळी उपस्थित
विश्वजीत काळे, नारायण पाटील गणेश तरटे, नागनाथ एकाळे , काशिनाथ एकलारे, बालेसाब शेख, मनोज एकाळे, किशन एकाळे, परमेश्वर तरटे, शेसू कांबळे, , शब्बीर भाई शेख तसेच मोठ्या प्रमाणात गावातील सर्व नागरिक उपस्थित होते.