
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद उपसंपादक- मोहन आखाडे
अखिल भारतीय संत भगवान बाबा वंजारी ओबीसी महासंघातर्फे दिनांक 5 फेब्रुवारी सन 2023 रोजी सकाळी 11:30 वाजता
” गौरी हॉल (मांजर्ली) बदलापूर पश्चिम”
तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे मुंबई
येथे मेळावा आयोजित केला आहे.
सदर मेळाव्यात महासंघाच्या वतीने “वधु वर परिचय संमेलन व महासंघाचे सन 2023 दिनदर्शिकेचे विमोचन” मान्यवरांच्या हस्ते होणार आहे महासंघाचे उर्वरित कार्यक्रम या मेळाव्यात घेण्यात येणार आहे
या मेळाव्याचे उद्दिष्ट सर्व शाखीय सकल वंजारी समाजातील “ऐक्य ” निर्माण करण्यासाठी हा मेळावा आयोजित केला आहे
तरी समाजातील सर्व पक्षीय राजकीय पुढारी, सर्व खात्यातील आजी-माजी अधिकारी व कर्मचारी, नामांकित व्यक्ती, सर्व स्तरातील व्यावसायिक, डॉक्टर्स, इंजिनीयर ,वकील, प्राध्यापक , शिक्षक, सन्माननीय शेतकरी व सर्व वंजारी बंधू आणि भगिनींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे व मेळाव्याच्या लाभ घ्यावा व हा एक दिवस समाजासाठी आवर्जून द्यावा ही नम्र विनंती
आसे अवाहन श्री विजय कालेवार यांनि केले आहे
या कार्यक्रमासाठी श्री रामराव लव्हारे राष्ट्रिय अध्यक्ष,श्री रामराव बिक्कड राष्ट्रिय महासचिव, इंजी.विजय कालेवार अध्यक्ष महाराष्ट्र श्री सुरेश हेमके,श्री प्रकाश घुले,श्री सुरेश ढाकने,श्री रामकुष्ण सोनवने ,श्री जयपाल फ़ड,श्री अशोक येलमामे हे उपस्थित राहानर आहे