
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भू म:- सांगली येथील पुष्पराज चौकामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची व नामफलकाची विटंबन केल्याप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी लहुजी शक्ती सेना भूम,परांडा,वाशी, यांच्यावतीने उपविभागीय कार्यालयामार्फत मा. मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच या प्रकरणातील दोषी समाजकंटकांवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी,अन्यथा लहुजी शक्ती सेनेच्या वतीने महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला.या घटनेचा निषेध म्हणून काळ्या फित व पारंपरिक वाद्य(हालगी) वाजवून निषेध करण्यात आला.
या निवेदनावर लहुजी शक्ती सेना भूम चे लहूश्री प्रा.दत्ता भाऊ (गुरुराज) साठे (उस्मानाबाद जिल्हा युवक अध्यक्ष) वाशीचे लहूश्री डॉ- मारुती भाऊ क्षीरसागर (उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्ष) परांड्याचे लहूश्री- गणेश भाऊ शिंदे (उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्ष) भूम तालुका अध्यक्ष लहूश्री- बालाजी भाऊ मिसाळ, भूम तालुका उपाध्यक्ष लहूश्री-संतोष भाऊ मिसाळ, भूम शहराध्यक्ष लहूश्री. अनुरथ भाऊ कसबे,लहूश्री- संतोष भाऊ साठे, लहूश्री राजुभाऊ साठे, लहूश्री- निखील भाऊ शिंदे, लहूश्री-श्रीराम भाऊ साठे, लहूश्री- बबन भाऊ साठे आदींसह इतरही कार्यकर्ते उपस्थित होते.