
दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी – शिवकुमार बिरादार
मुखेडचे भुमिपुत्र श्रावण रॅपनवाड
राहूल गांधी यांच्या संकल्पनेतील कन्याकूमारी ते कश्मीर भारत जोडो यात्रा यशस्वीपणे पुर्ण करुन भारत यात्री श्री डाॅ.श्रावण रॅपनवाड यांचे संचखंड एक्सप्रेसने आज नांदेड येथे आगमन झाले.त्यांचे भव्य स्वागत जिल्हा व शहर काॅंग्रेस कमीटीच्या वतीने करण्यात आले.यावेळी जि.प.चे मा.अध्यक्ष दिलिपराव पाटील बेटमोगरेकर,जिल्हाध्यक्ष गोंविदराव पाटील नागेलीकर,तालूकाध्यक्ष राजीव पा.रावणगांवकर,जिल्हा प्रवक्ते दिलिप कोडगिरे,शहराध्यक्ष नंदकूमार मडगुलवार,मा.जि.प. प्र.संतोष बोनलेवाड,रामेश्वर पाटील इंगोले,संभाजी पा.भीलवंडे,ऊमाकांत पवार,बालाजी वाडेकर,पत्रकार रियाज शेख,विश्वनाथराव कोलमकर,बबलु मूल्ला,अदनान पाशा,ईम्रान पाशा यांनी भव्य पुष्पहार व पुष्पगूच्छ देवून स्वागत केले.राहूल गांधी,अशोकराव चव्हाण,काॅंग्रेस पक्षाच्या जिंदाबाद घोषणांनी अवघे रेल्वे स्टेशन दणाणुन गेले होते.डाॅ.श्रावण रॅपनवाड यांचे त्यांच्या सूवीद्य पत्नी डाॅ. सौ.दिपाली ताई रॅपनवाड व त्यांच्या सहकारी महीला यांनी औक्षण करुन स्वागत केले.