
दैनिक चालु वार्ता पुणे शहर प्रतिनिधी- विशाल खुणे
दि 04 फेब्रु 2023
नव्या सांगवीतील समतानगर मधील गल्ली नंबर एक मध्ये ओल्या कचऱ्यासाठी हिरवा रंग व सुक्या कचऱ्यासाठी निळा रंग असे स्वच्छतेचे दोन रंग या मोहिमेबद्दल नागरिकांना माहिती देण्यात आली. ओला व सुका कचरा तसेच सैनिटरी वेस्ट आणि घातक कचरा वर्गीकरण करण्याबद्दल सांगण्यात आले. दोन डस्टबिन ठेवण्याबाबत नागरिकांना आवाहन करण्यात आले.
त्याचप्रमाणे (2.0 टॉयलेट सर्वे) ऑनलाईन फीडबॅक फॉर्म विषयी माहिती देन्यात आली.
समतानगर 1 येथील नागरिकांना भेट देऊन टॉयलेट सर्वे करिता QR code चा वापर करून नागरीका कडून ऑनलाइन feedback form भरवून घेण्यात आले.
नागरिकांना या सर्वे बद्दल विस्तारित स्वरूपात माहिती प्रोजेक्ट सहाय्यक अंकुश कांबळे यांनी दिली. नागरिकांनी ही सकारात्मक प्रतिसाद दिला
तसेच स्वच्छ सर्वेक्षण 2023 बद्दल नागरिकांना उपयोजनात्मक माहिती देण्यात आली.
त्याचप्रमाणे घंटागाडी बरोबर असणाऱ्या प्रोजेक्ट सहाय्यक आशा गायकवाड यांनी नागरीकाना सुका कचरा, ओला कचरा व घातक कचरा वर्गीकरण कसे करावयाचे याचे आरोग्य वर होणारे दुष्परिणाम या बद्दल नागरिकांना माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. यावेळी आण्णा जोगदंड यांनी स्वच्छते बद्दल माहिती देऊन आपण सर्वांनी एकत्र येऊन सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आपल्यासाठी पालीकेचे आरोग्य कर्मचारी आपले आरोग्य धोक्यात घालून काम करत असल्याचे जोगदंड यांनी सांगितले. ओला, सुका, घातक, वैद्यकीय व सॅनिटरी वेस्ट कचऱ्याचे वर्गीकरण करून आम्ही पालीकेस सहकार्य करु वेळप्रसंगी आम्ही ही तुमच्या बरोबर जनजागृती करण्यास तयार असल्याचे जोगदंड यांनी सांगितले.
या वेळी आरोग्य विभागाचे प्रोजेक्ट सहाय्यक आशा गायकवाड, सागर देवकर, अंकुश कांबळे,वॉर्ड इन्चार्ज अमन बिऱ्हाडे, सामाजिक कार्यकर्ते आण्णा जोगदंड, वसंतराव चटके, अरविंद मांगले, संगिता जोगदंड, गौतम जाधव, आशा जाधव चालक जयश्री साळुंखे, सुनिता धुरंधरे सह उपस्थित होते.