
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
नांदेड – विद्यार्थी जीवनात सांस्कृतिक कार्यक्रमाचे महत्त्व अधिक आहे. कारण विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच त्यांचा सांस्कृतिक अंगाने विकास व्हावा, त्यांना आपले कला कौशल्य अभिव्यक्त करता यावेत, अभिनयाची संधी मिळावी या उद्देशाने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते . तसेच लोहा तालुक्यातील सतत उपक्रमशील असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निळा येथे दि. 1.2.2023 रोजी बालकलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम सायंकाळी 6.50 ते 11.45 या वेळात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात देशभक्तपर गीते , भावगीते , भक्ती गितांसह लावणी , यासारख्या अनेक गितांची मेजवानी बाल कलाकारांनी निळा वासीयांना पहावयास सादर केली
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे माजी मुख्याध्यापक आमचे मार्गदर्शक श्री मन्मथराव किडे सर उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणुन सौ. आशाताई श्यामसुंदर शिंदे (शेकाप प्रदेशाध्यक्षा महाराष्ट्र राज्य)
उपस्थित होत्या.प्रमुख पाहुणे मा. भगवानराव पा. इंगळे (चेअरमन सोसायटी निळा मा. अशोक आढाव (केंद्रप्रमुख सा.का. गांधीनगर) सौ. उज्वलाताई मोरे (अध्यक्षा शाळा व्यवस्थापन समिती निळा ) मा. बालाजी गजले
(सरपंच निळा) मा. गजानन पा. मोरे (उपसरपंच निळा)
मा. संतोष मोरे (उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती निळा) मा. सोपानराव पा. मोरे (पोलीस पाटिल निळा)
मा. शेख सर ( मुख्याध्यापक प्रा. शा. निळा)
या कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांच्या हस्ते फित कापुन झाले यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम घेतल्याने विद्यार्थ्यांचा कला गुणांना वाव मिळतो असे यावेळी उद्गार काढले शाळेसाठी कंपाऊंड व बोर देण्याचे अभिवचन गावकऱ्यांच्या समोर दिले. सदरील सांस्कृतिक कार्यक्रमाला बाल विद्यार्थीना 16000 बक्षीस जमा झाले.
गावकऱ्यांकडून उत्कृष्ट कार्यक्रम घेतल्याबद्दल सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील प्राथमिक शिक्षक विशाल महाबळे सर यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. शेख सर, श्री. लांडगे सर, श्री. मठपती सर, श्री. महाबळे सर, सर्वजीत धुतराज सर तंत्रस्नेही शिक्षक, सौ. मोरे मॅडम, सौ.कस्तुरकर मॅडम, सौ. स्वामी मॅडम त्याचबरोबर प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या पालक, सर्व गावकरी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती निळा, सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य ग्रामपंचायत निळा या सर्वांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपसरपंच गजानन पा. मोरे यांनी केले. हा कार्यक्रम जिल्हा परीषद प्राथमिक शाळा निळा येथे संपन्न झाला