
दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
अहमदपूर:- मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड ,जिजाऊ ब्रिगेड, पंजाबराव देशमुख साहित्य परिषद,बामसेफ व इतर समविचारी संघटनेच्या वतीने आयोजित जिजाऊ- सावित्री व्याख्यानमालेच्या सतराव्या वर्षातील तिसरे पुष्पगुंफण्यासाठी पुणे इथून आलेले थोर विचारवंत व्यक्तीवर कृतीशील सामाजिक कार्यकर्ते प्रा. गंगाधर बनबरे यांनी राजसत्ता लोकशाही व वर्तमानातील राजकारण्या विषयावर आपले विचार मांडले कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्ञानबा भोसले यांनी जिजाऊ वंदना घेतली प्रास्ताविक मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अशोक चापटे यांनी केले तर पाहुण्यांच्या परिचय जिल्हा उपाध्यक्ष प्रा. गोविंद शेळके सर यांनी करून दिले राजसत्ता ,लोकशाही व वर्तमानातील राजकारण या विषयावर बोलत असताना प्रा.बनबरे सर यांनी बौद्धिक तथा वैचारिक सरोगशी, महापुरुषांचे सिमिलेशन आणि रोमॅन्टिशीझम या विषयावर प्रकाश टाकत फॅसिस्टवाद व मानवतावाद यातील फरक समजून सांगितला जर या देशांमध्ये एकच धर्म,एकच रंग, एकच झेंडा, एकच पक्ष अशी परिस्थिती निर्माण झाली तर देशाला हुकूमशाही यायला वेळ लागणार नाही असे सांगत राजसत्ता, समतावादी, मानवतावादी असली पाहिजे असे विचार मांडले पुढे बोलताना ते म्हणाले की सत्ता स्वार्थासाठी नव्हे तर लोक हितासाठी जन करण्यासाठी असली पाहिजे यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याच्या दाखला दिला पूर्वीच्या काळी धर्मसत्ता आणि राजसता या वेगवेगळ्या स्तरावर काम करत असे ते म्हणाले लोक हितासाठी, लोक कल्याणासाठी डॉ. पंजाबराव देशमुख, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या मंत्रिपदाची राजीनामे दिल्याचे उदाहरणे त्यांनी दिले लोकशाही पुढील आव्हाने या विषयी बोलत असताना प्रा.बनवरे सर म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही पुढील तीन आव्हाने सांगितली होती ती म्हणजे राजकीय पक्षाची विचारसरणी जर देशापेक्षा राजकीय पक्षाला महत्त्वाचे स्थान असेल तर ते लोकशाहीला घातक आहे देशांमध्ये जर विभूती पूजेला महत्त्व देण्यात आले अथवा व्यक्त पूजा होत असेल राष्ट्रापेक्षा एखादी व्यक्ती स्वतःला मोठी समजत असेल तर अशावेळी लोकशाही धोक्यात येऊ शकते आणि देशात सामाजिक व आर्थिक लोकशाही पेक्षा राजकीय लोकशाहीच राहिली तर लोकशाही नष्ट व्हायला वेळ लागणार नाही या व्याख्यानमालेसाठी शरीरातील व तालुक्यातील हजारो बुद्धिजीवी श्रोते संस्कृती मंगल कार्यालय येथे उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक प्रा. मारुती बुद्रुक पाटील यांनी केले तर आभार प्रा. डॉ. संतोष पाटील यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड व इतर समविचारी संघटनाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले