
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
सरकारचे भवितव्य कापसाच्या भावावर अवलंबून असुन सरकारने कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये हमी भाव द्यावा अशी मागणी शेतकरी मित्र साहेबराव पाटील काळे यांनी केली आहे.
लोहा तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात व कापसाचे मार्केट कोसळले असुन यंदा सुरुवातीला कापसाला प्रति क्विंटल १४ हजार रुपये भाव मिळाला होता पंरतु आता १४ हजारांहून ८ हजार रुपयांवर कापसाची घसरण झाली आहे त्यामुळे शेतकरी बांधव मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
पेरणी,निंदणे, फवारणी,खत आदी कबाडकष्ट करून देखील शेतकऱ्यांच्या हाताला काहीच लागत नाही . कापसे दर घसरल्यामुळे शेतकरी बांधव अडचणीत आले आहेत .
आपला देश हा कृषिप्रधान देश असून शेतकऱ्यांचे हित सरकारने जोपासले पाहिजेत पंरतु शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळत नाही.
राज्यात नुकत्याच झालेल्या शिक्षक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक झाली व या निवडणुकीत विद्यमान सरकारच्या विरोधात मतदान केले जर आता कापसाला सरकारने कमीतकमी १२ हजार रुपये हमी भाव दिला नाहीतर सरकारचे आगामी निवडणुकीत काही खरे नाही कापसाच्या भावावर सरकारचे भवितव्य अवलंबून आहे असे शेतकरी मित्र साहेबराव पाटील काळे यांनी म्हटले आहे.