
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी-दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत, लोकराजे, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त साधून येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यातील शूर मर्द मावळ्यांना एकत्र करून आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. येणाऱ्या असंख्य पिढ्यांसाठी त्यांचे कार्य प्रेरणादायी ठरणारे आहे.
याप्रसंगी परभणीचे माजी खासदार तथा शिंदे गटाच्या शिवसेनेचे संपर्कप्रमुख ॲड.सुरेश जाधव यांच्या सोबत आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे, तालुका प्रमुख माउली फड, उपतालुकाप्रमुख रमेश सातपुते, नगरसेवक अर्जून पुरनाळे, शाहू मुंडे, विशाल सातपुते, विश्वनाथ भोसले, बळीराम राठोड, नरेंद्र भालेराव, गणेश जाधव, लिंबाजी व्हावे, अक्षय सातपुते, प्रभाकर भोसले, विष्णू भोसले, सतीष शिंदे व समस्त गावकरी दिसत आहेत.