
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे राष्ट्रीय महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने शनिवार, दि.२५ फेब्रुवारी २०२३ रोजी परभणी जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत, अशी माहिती आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली आहे.
नवी दिल्लीत विविध कामासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आपण भेट घेतल्याचे सांगून त्यावेळी अन्य विविध विषयांवर चर्चा झाल्याचेही आ.बोर्डीकर यांनी सांगितले. जिल्ह्यातील रस्ते विकासाच्या अनुषंगाने परभणी जिल्हा दौरा करीत आढावा घ्यावा, अशी विनंती ना. गडकरी यांच्याशी केल्याचेही नमूद करीत आ. बोर्डीकर यांनी २५ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजता गडकरी हे परभणीत दाखल होणार आहेत असे सांगितले. त्यांनी पुढे असेही सांगितले की, जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्याबरोबरच जिल्ह्यासाठी काही विकासात्मक दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून काहीं नवीन योजना जाहीर करतील अशी अपेक्षाही आ. बोर्डीकर यांनी व्यक्त केली.
त्या निमित्ताने ना. गडकरी यांच्या स्वागतासाठी जिल्हाभरातील नागरिक आणि भाजपाचे सर्व पदाधिकारी यांच्या तर्फे जय्यत तयारी करणार असल्याचे आ. बोर्डीकर यांनी सांगितले. त्यामुळे ना. गडकरी हे नेमके कोणत्या योजनेबद्दल आणि जिल्हाधिकाऱ्यांनी प्रलंबित कोणत्या प्रकल्पावर प्रकाश टाकतील, याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागून राहिल्यास नवल वाटू नये.