दैनिक चालू वार्ता परतूर/प्रतिनिधी
परतुर :येथील बागेश्वरी साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे गतवर्षी घेतलेले दहा हजार रुपये प्रत्येकी अनामत रक्कम परत करावी व शेतकऱ्यांना प्रति टन तीन हजार रुपये भाव द्यावा व शेतकऱ्यांना एक रक्कमी बिल देण्यात यावे या मागण्यांसाठी तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी गनिमी पद्धतीने कारखान्यात प्रवेश करून अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले यावेळी त्यांनी घोषणा दिल्या. या मुळे कारखाना प्रशासना अधिकारी काही काळ गोंधळून गेले.
गेल्या अनेक दिवसापासून शेतकऱ्यांची अनामत रक्कम घेतल्यानंतर शेतकऱ्यांचा ऊस टाकण्यात नाही आला अशा तक्रारी असताना कारखान्याने क्षमता वाढवून शेतकऱ्यांचा ऊस काढण्याचा प्रयत्न केला तरीही अनेक शेतकऱ्यांना आपला ऊस न गेल्याने उभा ऊस जाळावा लागला तर काहींनी उसावर नांगर फिरविले होते, अशा शेतकऱ्यांची जमा असलेली अनामत रक्कम परत करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली त्यातच काही शेतकऱ्यांनी माँ बागेश्वरी
कारखान्याच्या कार्यालयात घुसून गनिमी काव्याने केले, या वेळी कपडे काढून ठिय्या आंदोलन केले व घोषणा दिल्या, शेतकऱ्यांचे घेतलेले एकरी १० हजार वापस द्या, एका टप्यात शेतकऱ्याला सर्व बिल द्या, उसाला ३ हजार टना प्रमाणे भाव द्यावा या प्रमुख मागण्या होत्या.
या वेळी गजानन चवडे पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले, त्यांच्या सोबत रामजी सोळंके, गणेश सराटे, रामा यादव, अण्णा सुरासे, अशोक काळे, महादेव जाधव आदींची उपस्थिती होती..
