
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा /-सुरेश ज्ञा. दवणे.
मंठा आरोपीकडुन मोबाईल, रोख रकम व मोटार सायकलसह असा एकुण रु.१,१४,५०० माल जप्त.पोलीस ठाणे मंठा येथे (ता.२५) रोजी फिर्यादी नामे दत्ता संतोष व्यवहारे वय -१९ वर्षे धंदा मजुरी रा. टिटवी ता. लोणार जि. बुलढाणा याने फिर्याद दिल्यावरुन पोलीस ठाणे मंठा येथे गुन्हा क्र. ५५/२०२३ कलम ३९४,३४ भादवि प्रमाणे जबरी चोरी चा गुन्हा दाखल आहे.
(ता. २४) रोजी रात्री ९.३० वा. फिर्यादी हा मोटेवाडी ता. माजलगाव जि. बिड येथुन हा उसतोडी करुन आपल्या मुळ गावी टिटवी कडे स्वातः च्या मोटार सायकलने जात असतांना फिर्यादीस रस्ता माहित नसल्याने त्याने मंठा चौफुली वर उभे असलेल्या अनोळखी तिन व्यक्ती यांना रस्ता विचारले असता, त्यांनी पण आम्हाला लोणार येथे जायाचे आहे.
असे सांगीतले व त्यांच्या मागे मोटार सायकल घे असे सांगीतले. फिर्यादी हा त्यांच्या मागे मोचार सायकल घेवुन जात असतांना उस्वद रोडवरील हॉटेल दुर्गा जवळ त्या तिघामधिल एक इसम फिर्यादीच्या मोटार सायकलवर बसला व उस्वद रोडवरील बत्तीस के. व्ही एम. एस.बी. कार्यालयाच्या थोड्या समोर अंतराव उर्वरीत दोन अनोळखी आरोपींनी फिर्यादीचा मोटार सायकल आडवुन फिर्यादी सोबत बसलेल्या इसमाने फिर्यादीस मोटार सायकल वरुन ढकलुन दिले व फिर्यादी यास लाथाबुक्कयांनी व चापटबुक्कयांनी मारहाण करुन त्याच्या जवळी १३,५००- रुपये, रेडमी नाईन एन कंपनीचा मोबाईल व वरच्या खिशातील १०००- रुपये रोख रक्कम त्यांनी बळजबरीने काढुन घेवुन पोलीसांत तक्रार दिली.
तर जिवे मारु अशी धमकी देवन ते आरोपी एच.एफ. डिलक्स कंपनीची मोटार सायकल एम.एच.२१ बी.डब्ल्यू-७९८७ वर पळुन गेले ईत्यादी वर्णनाच्या फिर्यादीवरुन वरील तिन ईसमांवर गुन्हा दाखल असुन यातील घटनास्थळाच्या आजुबाजुचे सी.सी.टी.व्ही फुटेज तपासुन यातील आरोपींची ओळख पटवुन आरोपी नामे १) वसीम काला कुरेशी वय २७ वर्षे रा. सम्राट अशोक नगर मंठा, २). आमोल आशोक ढाकरगे वय – २६ वर्षे रा. देवी रोड मंठा, ३). संजय गणेश गहिरे या सर्वां विरुद्ध गुन्हा दाखल केला असुन यातील आरोपी वसीम काला कुरेशी व आमोल आशोक ढाकरगे यांना अटक केली असुन त्यांच्या कडुन १३,५०० रु. चा रेडमी नाईन एन कंपनीचा मोबाईल व रोख रक्कम १००० रु. व आरोपीचा मोटार सायकल रु.१,००,०००- असा एकुण १.१४,५००- रु. चा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरची कामगीरी मा. पोलीस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय पोलीस अधिकारी राजु मोरे, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, फौजदार असमान शिंदे, फौजदार बलभीम राउत, पोकों कानबा हराळ, संदीप राठोड,सुनिल ईलग,आसाराम मदने,मांगीलाल राठोड, दिपक आढे, प्रशांत काळे, आनंद ढवळे, सपोउपनि आढे यांनी सदरची कामगीरी बजावली आहे.