
दैनिक चालू वार्ता निलंगा प्रतिनिधी- इस्माईल महेबूब शेख.
======================
निलंगा:09/03/2023 निलंगा तालुक्यातील शिऊर गावात पुरातन काळापासून रॅडी हा सन होळी धुळीवंदन च्या दिवस नंतर रॅडी हा सण साजरा केला जातो. गावातील लक्ष्मी मंदिराच्या समोर एक मोठा खड्डा तयार केला जातो, यामध्ये पूर्ण भरून पाणी साठवले जाते. गावातील प्रत्येक कुटूंबाकडून या रॅडी ला नैवद्य दाखवले जाते, आणि गावातील प्रतिष्ठीत वेक्ती या रॅडीत उडया मारतात. पूर्वजांपासून असे समज आहे की उडया मारून खड्याबाहेर आलेले पाणी वेशीपर्यंत गेले पाहिजे , त्या नियमाप्रमाणे येशीत पाणी येइपर्यंत उढ्या मारून पाणी वेशीपर्यंत पाणी काढले जात. हा सर्व उत्सव बँड बाजाच्या तालात साजरा केला जातो.या कार्यक्रमास कार्यक्रमाचे मानकरी श्री भास्कर पाटील, सरपंच भानुदास सुर्यवंशी, उपसरपंच शेषेराव बंडगर, शेराराव बिरादार, रबानी शेख, उमाकांत टकले, नरशिंग बंडगर, किरण पाटील, राजकुमार रंडाळे, अमर पाटील, प्रताप तुगावे, प्रशांत पाटील , नरसिंग दंडवते, शंकर धानुरे, अस्लम पाटील, ताजोद्दीन शेख, हुसेनसाब सय्यद, अरुण आष्टुरे , माधव पाटील आणि समस्त गावकरी यांच्या उपस्तीतीत कार्यक्रम संपन्न झाला.