
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
मा.जिल्हाधिकारी साहेब यांना दिनांक, ८ मार्च २०२३,रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदन देऊन निवेदनात पुढे म्हणाले कि परतूर शहरातील बालाजी नगर येथे आर्दश शाळा आहे,या आदर्श शाळेतील अनेक वर्षापासून विद्यार्थी संख्या कमी आहे म्हणून विद्यार्थ्यांची हेरा फेरी करुन हि शिक्षण संस्था शाळा चालवत हि कमाल आहे, करण या आर्दश शाळेत विद्यार्थ्यांची शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी नोंद आहे ती नोंदणी खोटी आहे,या शाळेतील अनेक विद्यार्थी बाहेर गावी गुरूकुल मध्ये पुर्ण शिक्षण घेतात,परंतु आर्दश शाळेतील विद्यार्थी संख्या खूप कमी आहे अनेक नागरीकांच्या तोंडी तक्रारी आहेत, म्हणून आदर्श शाळेतील विद्यार्थींची गोपनीय ठेऊन पटपडताळणी करावी, कारण गुरुकुल ते शाळा,आर्दश शाळा ते गुरुकुल हेराफेरी होईल म्हणून गोपनीयता ठेवून कारवाई करण्यात यावी, कारण विद्यार्थी पट संख्या नुसार शिक्षक इतर कर्मचारी भरती केल्याली आहे, तसेच गुरूकुल व शिक्षण संस्था चालक यांची मिली भगत आहे,कारण आर्दश शाळेतील विद्यार्थ्यांची पटपडताळणी करुन कारवाई करण्यात यावी,अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अपेक्षा आहे.परतूर शहरात बालाजी नगर येथील आदर्श शाळेत विद्यार्थ्यी कमी आहे,याची पटपडताळणी करुन शिक्षक इतर कर्मचारी कमी करण्यासाठी कारवाई करुण आज पर्यंत विनाकारण खोटी विद्यार्थी संख्या दाखवून शासनाचा फुकटचा पगार घेणाऱ्या शिक्षकांना बडतर्फ करून आज पर्यंत घेतलेला पुर्ण पगार वसूल करण्यात यावी तसेच शाळेतील विद्यार्थी संख्या बोगस दाखवून चुकीच्या पद्धतीने काम केले म्हणून शिक्षण संस्था चालक यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.योग्य ती कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने १४ मार्च २०२३ रोजी उपविभागीय अधिकारी परतुर यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी.असा इशारा हि देण्यात आला.