
दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
————————————————–
लातूर/अहमदपूर:-भारतीय दलित पँथरच्या पुनरगठणासाठी महाराष्ट्रभर संघर्षशिल कार्यकर्त्यांच्या बैठका सुरु असून त्याचाच भाग म्हणून बहुजन नेते मान्यवर कांशीरामजी यांच्या यांच्या जयंती निमित दि. १५ मार्च रोजी लातूर येथे पत्रकार भवनामध्ये
दु. १२ वा. महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली आहे.
मागील कांही दशकांपासून दलित, आदिवासी, ओबीसी, भटक्या-विमुक्त व अल्पसंख्यंकांचे आर्थिक, सामाजिक व राजकीय प्रश्न उग्र झाले आहेत. बहुजन समाजाचे संविधानिक हक्क डावलून त्यांना विकास व प्रगतीच्या प्रक्रियेतून बेदखल करण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे. बहुजन समाजाला संविधानिक हक्क मिळवून देण्यासाठी भारतीय दलित पँथरने पाच दशकापूर्वी संघर्षाचा झंजावात निर्माण करून प्रश्न सोडवून घेण्यासाठी भाग पाडले होते. आजच्या परिस्थितीत पुन्हा भारतीय दलित पँथरची गरज असल्याच्या तीव्र भावना व्यक्त होत आहेत. समाजाच्या भावनांचा सन्मान राखण्यासाठी महाराष्ट्रात भारतीय दलित पँथरच्या पुनरगठणासाठी बैठका सुरु असून लातूर येथे बैठक आयोजित केली असून या बैठकीत भारतीय दलित पँथरच्या स्थापनेपासूनच कारयरत असलेले कार्यकर्ते रामराव गवळी हे मार्गदर्शन करणारे आहेत. तरी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या संघर्षशिल कार्यकर्त्यांनी बैठकीस आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन संजयभाऊ कांबळे, किशोरभाऊ कांबळे, सुनील क्षीरसागर, ंप्रा. अनिल तलवार, दत्ता कांबळे व भीम शाहिर धम्मपाल सावंत यानी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.