
दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
लातूर/अहमदपूर:- परभणीच्या मानवत शहरातून जाणा-या राष्ट्रीय महामार्ग २२२ कल्याण ते निर्मल रस्त्यावर आज सकाळी ट्रकने दुचाकीला उडवल्यामुळे भीषण अपघात झाला. या भीषण आपघातामध्ये दोन शिक्षकांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मानवत येथील शकुंतला विद्यालयातील रामेश्वर कदम आणि गंगाधर राऊळ हे दोन शिक्षक आपल्या दुचाकीने शाळेकडे येत असताना पाथरीहून परभणीकडे भरधाव वेगाने जाणा-या ट्रकने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात दोघाही शिक्षकांचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर ट्रकचालक जागेवरून फरार झाला आहे. रामेश्वर कदम आणि गंगाधर राऊळ अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या शिक्षकांची नावे आहेत. दोन्ही शिक्षक मानवत येथील शकुंतला विद्यालयातील असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कदम आणि राऊळ हे दोघेही शिक्षक दुचाकीवरून आज पहाटेच्या सुमारास महाविद्यालयात निघाले होते.
मानवत शहरातून जाणा-या कल्याण ते निर्मल राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वर दुचाकी आली असता समोरून येणा-या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये दोन्ही शिक्षकांची जागीच मृत्यू झाला आहे.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही शिक्षकांचे मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. या घटनेनंतर ट्रकचालक हा पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.