दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
लातूर/अहमदपूर:- येथील बौध्द नगर येथे भीमराज ग्रूपच्या वतीने गेल्या अनेक दिवसांपासून बालकांना विविध धाडसी क्रीडा प्रकाराबरोबरच धम्म प्रशिक्षण,महापूरूषांचे चरित्र समजावून सांगणे,अंधश्रध्दा निर्मूलन, समाजात समता प्रस्थापित होवून चारित्र्यसंपन्न व्यसनमुक्त व्यक्तीमत्व घडावे या साठी येथील युवक महिला यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न अतिशय प्रेरणादायी असून समाजाला सद्यस्थितीला या बाबींची नितांत आवश्यकता आहे यासाठी समाजघटकांनी अशा उपक्रमास मदतीची भूमीका ठेवावी असे प्रतिपादन युवक नेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी केले.
गेल्या दोन वर्षांपासून भारतीय बौध्द महासभेचे माजी तालुकाध्यक्ष शेषेराव ससाणे,सामाजीक कार्यकर्ते अतूल ससाणे, अंजलीताई वाघंबर, प्रा.सूनिल दहीकांबळे आदींनी पूढाकार घेवून बूध्द आणी त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन या बरोबरच विविध धार्मिक कार्यक्रम राबविण्यात आले.पूढे या कामास भिमराज ग्रूपचे आनंद लामतूरे,आदित्य ससाणे,सूमित नवरंगे, शंतनू नवरंगे,सूरज वाघमारे,जय गूळवे,रतन बनसोडे,अजिंक्य बनसोडे,प्रकाश बनसोडे, आदीं युवकांनी यात पूढाकार घेवून छोट्या विद्यार्थ्यांना विविध क्रिडा प्रकारामध्ये तरबेज करण्यासाठी दैनंदिन प्रशिक्षण वर्ग घ्यायला सूरूवात केली आहे.यात सर्व मैदानी खेळा बरोबरच लाठी प्रशिक्षण,स्वयं संरक्षणासाठी कराटे आदी क्रिडा प्रकार शिकवण्यास सूरूवात केली आहे.आज घडीला येथे जवळपास शंभरच्या आस पास विद्यार्थी नियमीत प्रशिक्षण घेत आहेत. या उपक्रमास भेट दिली असताना येथील युवक मित्रांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी संघर्ष करून निधी मंजूर करून आणल्या बद्दल डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांचा समाजबांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देत असताना मनोगत व्यक्त करत असताना या भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदित्य ससाणे यांनी केले तर आभार सूमित नवरंगे यांनी केले.या वेळेस आशाताई
दहीकांबळे,पार्वतीबाई तिगोटे,अनिता कांबळे, संगमेश्वर बनसोडे, अजय भालेराव, सचिन बानाटे, संविधान कदम,अनिल वाघमारे,प्रभावती तिगोटे, अश्वीनीताई बनसोडे, पापाताई दहिकांबळे, मैनाबाई नवरंगे,संगीता बनसोडे,अर्चना लामतूरे आदींची उपस्थिती होती.
सत्कार सन्मान भिमराजग्रूप
