दैनिक चालु वार्ता चाकूर प्रतिनिधी – नवनाथ डिगोळे
ग्रामदैवत श्री हनुमान मंदिर येथे श्री गणेश मुर्ती स्थापना व कलशारोहन सोहळा मोठ्या धार्मिक उत्साहात संपन्न झाला,
या कार्यक्रमाचा प्रारंभ दि,११मार्च रोजी कलशारोहणाची ग्रामप्रदक्षिणा भव्य शोभा यात्रा काढण्यात आली दि,१२ मार्च रोजी वास्तुपूजन जलाधिवास,धान्यधिवास होम हवन व इतर धार्मिक विधी वेधशास्त्रानुसार संपन्न करण्यात आले दिनांक १३ रोजी देवता अभिषेक प्रधान होम हवन बलिदान पूर्ण आहुती मूर्ती स्थापना व इतर विधी संपन्न करून गुरुवर्य श्री ष,ब्र,१०८ शंकरलिंग शिवाचार्य महाराज शिरूर अनंतपाळकर यांच्या शुभहस्ते कलशारोहण व ध्वजारोहण करण्यात आले,
यावेळी महाराजांनी उपस्थित भाविकांना आपल्या आशीर्वचनातुन
भाविकांना मी पणाचा त्याग करून आपल्या संसाराच्या मोह जाळ्यात अडकून न राहता भक्ती मार्गाकडे वळावे धार्मिक कार्यात अन्नदान तसेच दानधर्म करत राहावे आपल्या शुभवाणीतून उपस्थितांना संदेश दिला, त्यानंतर श्री हनुमान चालीसा चे पठन करून महाआरती करण्यात आली,
यावेळी उपस्थित हजारो महिला, पुरुष,माहेरवासीयांनी दर्शनाचा लाभ घेतला,यावेळी श्री हनुमान मंदिराची मोठ्या प्रमाणात फुलाची आरास व सजावट व तसेच विद्युत रोषणाई करण्यात आली होती, यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला व सोहळ्याचा आनंद व्यक्त केला, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री हनुमान मंदिर जीर्णोद्धार समितीच्या सर्व सदस्यांनी व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
