दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा) प्रतिनिधी: महाराष्ट्र सरकारने गेल्या काही दिवसापूर्वीच्या अर्थसंकल्पात महिला प्रवाशांना ५० टक्के प्रवास सवलत योजना जाहीर केली तोच धागा पकडत महिला प्रवाशाकडून दैनंदिन ५० टक्के सवलतीची तिकीटे मागितली जातात मात्र आम्ही तिकीट देऊ शकत नाही अशी व्यथा तळेगाव एसटी डेपो बसवाहक रंजीत कुंभरे यांनी प्रस्तुत प्रतिनिधी जवळ व्यक्त करत आपल्या भावनेला वाट मोकळी करून दिली अद्याप पावेतो प्रवास सवलत योजनेचा आदेश अप्राप्त असल्यामुळे आम्ही ५० टक्के योजनेची तिकिटे विक्री करू शकत नाही यातून महिला प्रवाशी प्रतिप्रश्न केले करतात वेळ प्रसंगी विनाकारण धारेवर धरण्याचा प्रयत्न करतात जणू आम्हीच तिकिटे न देण्यास जबाबदार आहोत या भावनेतून महिला प्रवासी संभाषण करत असल्याचा दैनंदिन कर्तव्य अनुभव बसवाहक यांनी बोलून दाखवला त्यामुळे महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या महिला प्रवाशांना ५० टक्के प्रवास सवलत आदेश लवकरात लवकर काढून आम्हा बसवाहकांना दिलासा माय बाप सरकारने द्यावा असे प्रस्तुत प्रतिनिधी जवळ बसवाहक कुंभरे व्यथा मांडत होते त्यामुळे महिला प्रवाश्यांना ५० टक्के प्रवास सवलतीचे आदेश काढण्याच्या बस वाहकाच्या व्यथेला दुजोरा देत धाडी येथील क्रियाशील सरपंच दिलीप भाकरे यांनी समर्थन दिले याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते नरेश मडावी,राजेंद्र नेहारे,विवेक पोटोडे आदी उपस्थित होते
