दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी – अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा)
महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती आष्टी तालुका शाखेच्या अध्यक्षपदी बी. टी. उरकुडे, कार्याध्यक्षपदी प्रतिक्षा दापूरकर, तर सचिवपदी प्रितम गायकी यांची सहमतीने निवड झाली आहे.
दिनांक १२ मार्च रोजी नवीन आष्टी ग्रामपंचायत कार्यालय येथे महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीची बैठक झाली.
या बैठकीला समितीचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सरकार, वर्धा जिल्हा कार्याध्यक्ष माधुरी झाडे तसेच जिल्हा पदाधिकारी हरिश पेटकर उपस्थित होते.
यांच्या उपस्थिती मध्ये नवीन आष्टी येथील नवीन सभासदांची ओळख, सभासद सहभाग तसेच शाखा नूतनीकरण करण्यात आले. या यावेळी गजेंद्र सरकार यांनी महा. अंनिसची तसेच त्यातील उपक्रमाची माहिती दिली. हरिश पेटकर यांनी संघटनेची पंचसूत्री सांगितली आणि माधुरी झाडे यांनी संघटनेमार्फत आपण किती व्यापक सामाजिक बदलाचे कार्य करू शकतो याचा आढावा दिला. बैठकीचे प्रास्ताविक तसेच आभार प्रतिक्षा दापूरकर यांनी केले.
मार्च ते डिसेंबर २०२३ या कालावधीसाठी ही कार्यकरिणी असणार आहे.
यावेळी रमाकांत गाडरे (कारंजा), प्रीतम गायकी (लहान आर्वी), रितेश कनेर ( लहान आर्वी), मंगला येनुरकर (पांढुर्णा), तसेच आष्टी येथील हर्षा राऊत, उज्वला टेकाडे, सरिता जाणे, ईश्वरी शेटे, प्रतिक्षा दापूरकर, मंगला बोरेकर, अनुजा गायकी, अमर मेंढे, मोरेश्वर गायकी हे उपस्थित होते.
इतर विभागाच्या निवडी पुढील प्रमाणे :
विविध उपक्रम विभाग कार्यवाह : मंगला येनुरकर वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्प विभाग कार्यवाह : मोरेश्वर गायकी
महिला सहभाग विभाग कार्यवाह : मंगला बोरकर,
महिला विभाग सहकार्यवाह: अनुजा गायकी,
युवा सहभाग विभाग कार्यवाह : अमर मेंढे यांची निवड करण्यात आली त्यानिमित्ताने त्यांचेवर अभिनंदनदांचा वर्षाव होत आहे
