दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे/बारामती:मृत्यू कुणाला कधी गाठेल याचा काही नेम नाही. अशीच धक्कादायक घटना बारामती तालुक्यात घडली आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत झाला आहे. यांच्यासह त्यांचा शेजारी देखील मृत्यूमुखी पडला आहे. कुणी कल्पनाही करु शकत नाही असा भयानक पद्धतीने त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
बारामती तालुक्यातील खांडज येथे ही घटना घडली आहे. चार जणांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. प्रकाश सोपान आटोळे, प्रविण भानुदास आटोळे, भानुदास आनंदराव आटोळे, बापुराव लहूजी गव्हाणे अशी मृतांची नावे आहेत.
या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. एकाच कुटुंबातील तिघा जणांचा या घटनेत जीव गेला आहे. यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. तसेच हळहळ ही व्यक्त केली जात आहे.
गोबर गॅसच्या टाकीमध्ये कालवलेल्या शेण काल्यामध्ये गुदमरुन चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुलगा गोबर गॅसच्या टाकीचे काम करत होता. यावेळी तो या टाकीत अडकला. वडील आणि चुलत्या बरोबरच शेजारी व्यक्ती या मुलाला वाचवण्यासाठी धावून आले. मात्र, चौघांचाही मृत्यू झाला आहे.
ही घटना घडल्यानंतर तातडीने चौघांना बारामती मधील सिल्वर ज्युबली या शासकीय उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महेश जगताप यांनी या संदर्भातील अधिक माहिती दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
