दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर:आज संपूर्ण महाराष्ट्रात जुनी पेन्शन मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना समन्वय समिती कडून बेमुदत संप पुकारला आहे. या अनुषंगाने आज देगलूर तालुक्यातील जवळपास दोन हजार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतले आहेत.
यावेळी सकाळी दहा वाजता देगलूर येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात समन्वय समिती देगलूर यांच्याकडून जुनी पेन्शन साठीबेमुदत संपात सहभागी होत असल्याचे निवेदन देगलूर तहसिलचे तहसीलदार राजाभाऊ कदम यांना सोपवण्यात आले. यानंतर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात सभा आयोजित करून पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माझी खासदार भास्करराव पाटील खतगावकर विद्यमान आमदार जितेश अंतापूरकर यांच्या आई श्रीमती शीतलताई अंतापूरकर, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शिवाजी देशमुख बळेगावकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील, माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष अविनाश निलमवार, बालाजीरोयलावार, शैलेंद्र चव्हाण, शिवसेनेचे संजय जोशी, मानवी हक्क अभियानचे मच्छीन्द्र गवाले आदी लोकप्रतिनिधींनी भेट देऊन पाठींबा दिला. आजच्या संपात शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, महसूल, आरोग्य विभाग, कृषी विभाग, नगरपालिका कर्मचारी, पाणीपुरवठा विभाग, जलसिंचन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पशुवैद्यकीय विभाग, शिक्षकेत्तर कर्मचारी, जूकटा संघटना आदी संघटनेचे सर्व कर्मचारी, पदाधिकारी व महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.