
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसासह जोरदार गारपीट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
या पार्श्वभूमीवरच राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज विधानपरिषदेत मोठी घोषणा केली.
सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 31 मे पर्यंत नुकसान भरपाई देण्यात येणार आहे, असं सांगितलं. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
31 मे पर्यंत सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे दिले जातील. यामध्ये नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीशिवाय राहणार नाही. यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत”, असं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं.
दरम्यान, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 21 फेब्रुवारी 2023 पर्यंत 50 लाख शेतकऱ्यांना 2305 कोटी रूपये नुकसान भरपाईचे वाटप विमा कंपन्यांनी केले आहे, असंही यावेळी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं.