
दैनिक चालु वार्ता देगलूर ग्रामीण प्रतिनिधी- माणिक सूर्यवंशी :
जुनी पेंशन जशास तशी लागू करावी यासाठी आज तहसील कार्यालयाच्या प्रांगणात घंटानाद आंदोलन करण्यात येऊन प्रशासनाचे लक्ष वेधले.
महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीकडून विविध विभागातील कर्मचाऱ्यांच्या वतीने आज सकाळी 10.45 वाजता शेकडो महिला-पुरुष कर्मचाऱ्यांच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात येऊन प्रशासनाचे लक्ष वेधले.
या घंटानाद आंदोलनात शहर व तालुक्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी,महसूल विभाग,आरोग्य विभाग,नगरपालिका,जलसिंचन विभाग,पाणीपुरवठा विभाग व अन्य विभागातील महिला -पुरुष कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिवसभरात वेगवेगळ्या सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संपाच्या ठिकाणी भेट देऊन मार्गदर्शन केले व संपास पाठींबा असल्याचे सांगितले.
संपाचा हा तिसरा दिवस यशस्वी करण्यासाठी समन्वय समितीच्या सर्व पदाधिकारी व उपस्थित कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.