
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी गंगाखेड-प्रेम सावंत
गंगाखेड: शहरामध्ये लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटीच्या वतीने दिनांक 16 मार्च 2023 रोजी राजेश्वर फंक्शन हॉल डि.पी रोड गंगाखेड येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये 200 पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी करण्यात आली.
या पैकी 35 रुग्णांना नांदेड लॉयन्स आय हॉस्पिटलमध्ये पुढील शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून नंदकुमार पटेल तर प्रमुख पाहुणे म्हणून उमाकांत कोल्हे पाटील, डॉ.अनिल बर्वे, अध्यक्ष गोविंद रोडे, कोषाध्यक्ष संजय सुपेकर, मदनदादा शिंदे, जगन्नाथ आंधळे, जगदीश तोतला यांची उपस्थित होती.
यावेळी नंदकुमार पटेल यांनी आपले मनोगत व्यक्त करताना असे सांगितले की,मी फाउंडर मेंबर असुन लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटी ने प्रथम वर्षात जे सामाजिक उपक्रम राबवले त्यामुळेच शिखर परिषदेमध्ये तब्बल 9 अवार्ड मिळाले आणि या क्लबचा सदस्य असल्याचा मला सार्थ अभिमान आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक विष्णू मुरकुटे यांनी तर प्रास्ताविक भगत सुरवसे यांनी केले.तसेच आभार प्रदर्शन गोपाळ मंत्री यांनी केले तर लॉयन्स ची प्रतिज्ञा कोषाध्यक्ष संजय सुपेकर यानी घेतली.
या कार्यक्रम यशस्वीते साठी लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटी चे कॅबिनेट ऑफिसर अतुल गंजेवार, अध्यक्ष गोविंद रोडे, सचिव भगत सुरवसे, कोषाध्यक्ष संजय सुपेकर, सहकोषाध्यक्ष गोपाळ मंत्री, संचालक अभिनय नळदकर, बंडु घुले, प्रकाश दादा घण, नागेश केरकर, अभिजित चौधरी, महेंद्र कांबळे, महेंद्र वरवडे, विठ्ठल शिंदे, चंद्रकांत गादेवार, शिवम गिरी, क्रष्णा पतंगे, सदानंद पेकम, सोनु सिंग ठाकुर तसेच लॉयन्स क्लब लेडीज फोरम च्या राणीताई राखे, माधुरीताई गंजेवार यानी परिश्रम घेतले.