
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी-विष्णु मोहन पोले
लातूर/अहमदपूर: अहमद्पुर हे शहर महाराष्ट्रात शिक्षणाच्या बाबतीत नावाजलेलं शहर.येथे समाजिक,राजकीय आणी इतर सर्व बदल झाले पण पाणी प्रश्न मात्र कायमचाच.शेजारला असलेल्या लिंबोटी धरणावरून अहमद्पुर शहराला पाईप लाईन झाली तेंव्हा नागरिकांमध्ये आनंद होता की आमचा पाण्याचा प्रश्न सुटेल पण अद्याप पर्यंत काही प्रश्न सुटलेला नाही तेच पंचवीस दिवसाला सुटणार पाणी. जसा उन्हाळा सुरु होतो तसे या शहराला पाणी प्रश्न भेडसावतो. लिंबोटी धरणात पाण्याचा मुबलक साठा असून पण अहमदपूर शहराला पाणी पंचवीस दिवसाला सुटत हा खूपच गंभीर प्रश्न आहे.नागरिकांना घोटभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.सध्या विध्यर्थ्यांच्या परीक्षा सुरु आहेत ,विद्यार्थी परीक्षे पेक्षा पाणी प्रश्नांनी व्यथित आहेत त्यांचा अभ्यास करण्याचा वेळ कुणाच्या खाजगी बोरच विनंतीकरून पाणी आणण्यात तर कुठे शहरापासून दूर विहिरीच पाणी आणण्यात जात आहे.नागरिकांच्या म्हणण्यानुसार दोन चार दिवसा आड पाणी सुटलं तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही पण नगरपालिकेच्या नियोजनाच्या अभावामुळे हे प्रश्न निर्माण होत आहेत.आमच्या शेजारी धरण असताना ,त्याच्यात भरपूर पाणी असताना,आम्हाला पाण्यासाठी पैसे मोजावे लागतात ,खाजगी टँकर मागवावे लागतात याला पालिका प्रशासन जबाबदार आहे अशा प्रकारच मत नागरिक व्यक्त करत आहेत.पालिकेने नागरिकांचे पाण्यासाठी होणारे हाल लक्षात घेऊन शहराला भेंड्सावणारा प्रश्न सोडवावा.तर दुसरीकडे प्रशासक म्हणत आहेत की लिंबोटी धरणातून अहमद्पुर शहराला असलेली पाईप लाईन फुटली होती ती आता दुरुस्त केली आहे .पंधराव्या वित्त आयोगाचा एक रुपया पण निधी आला नाही त्यामुळं महावितरण च बिल भरण्यासाठी अडचण येत आहे त्यामुळं महावितरण विद्युत पुरवठा खंडित करत आहे म्हणून पाणीपुरवठा व्यवस्थित होत नाही.राजकीय पुढारी ,प्रशासक,यांची वेगवेगळी उत्तर आहेत पण टॅक्स वेळेवर भरणारी सामान्य जनता म्हणतीय शेवटी धरण आमच्या उशाला!आणी कोरड घशाला!