
दैनिक चालु वार्ता म्हसळा- रायगड प्रतिनिधी – अंगद कांबळे
म्हसळा – महाराष्ट्र राज्याच्या माजी राज्यमंत्री तथा श्रीवर्धन मतदार संघाच्या लाडक्या आमदार आदिती तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी म्हसळा शहर महीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने म्हसळा ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना खाऊचे वाटप करण्यात आले.कार्यसम्राट आमदार आदिती तटकरे यांनी अल्पावधीतच राजकीय कार्यात आघाडी सरकारमध्ये तब्बल दहा खात्याचे मंत्री म्हणुन त्यांचे कार्य कर्तुत्वाची पाडलेली छाप,उत्कृष्ट राजकीय नेतृत्व करित असताना त्यांना प्राप्त झालेला पुरस्कार हा आजच्या महीला वर्गासाठी आणि नव्या पिढीला प्रेरणादायी व आदर्शत आहे.आमदार आदिती तटकरे यांना त्यांचे भावी आयुष्यात अधिक चांगले यश मिळावे यासाठी त्यांचे अभिष्टचिंतनासाठी म्हसळा महीला शहर अध्यक्षा शगुप्ता जहांगीर,तालुका युवती अध्यक्षा वृषाली घोसाळकर यांनी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना खाऊचे वाटप केले.