
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
नांदेड : – चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशदरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री मा.देवेद्र फडणवीस यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात सर्वसामान्य जनतेसाठी अनेक लोककल्याणकारी योजना जाहीर केल्या. त्यापैकीच एक म्हणजे नारिशक्ती च्या सन्मानार्थ महिला सन्मान योजना लागू केली.महामंडळाच्या बसेस मधून प्रवास करणाऱ्या महिला पन्नास टक्के तिकिटं दर आकरण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण वाहिनी असलेल्या एसटी ने प्रवास करणाऱ्या महिलांच्या शिंदे -फडणवीस सरकारच्या प्रति भावना जाणून घेण्यासाठी भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा तथा माजी जि.प.सदस्या सौ. प्रणिता देवरे-चिखलीकर यांनी स्वतः महिला सन्मान योजने अंतर्गत स्वतः तिकिट काढून मुखेड ते नांदेड प्रवास केला. त्या नेहमी प्रत्येक क्षेत्रात नेहमी पुढाकार घेऊन सतत महिलांना सामाजिक,राजकीय,सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी प्रेरणा देत असतात. त्यांनी पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून ओसाड माळरानावर भल्या पहाटे जाऊन सर्व सवंगड्यांना सोबत घेऊन घाम गाळून कष्ट करून ओसाड राने पाणीदार केले. त्यासह महिलांच्या स्वावलंबनासाठी त्यांनी जिल्ह्यात नाविन्यपूर्ण अनेक उपक्रम राबवले. त्यापैकीच कळमनुरी येथे निवासी फार्मर कप या चारदिवशीय प्रशिक्षणात त्यांनी स्वतः चार दिवस प्रशिक्षणार्थी शेतकऱ्यांसोबत मुक्कामी प्रशिक्षण पूर्ण करून त्या गावोगावी जाऊन गट शेती सह अनेक नाविन्यपूर्ण शेती करण्यासाठी त्या नेहमी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देतात.त्यांनी मुखेड ते नांदेड बस ने प्रवास केल्याचा व्हिडिओ सद्या सोशल मीडिया वर प्रचंड वायरल झाला असून त्यांचं सर्व क्षेत्रातून कौतुक होत आहे. या प्रवासादरम्यान त्यांनी महिला भगिनींशी संवाद साधत असताना त्या प्रवासा दरम्यान अंगणवाडी सेविका होत्या त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे व राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील युती सरकारने अंगणवाडी सेविकांचे मानधन वीस टक्के वाढ व तसेच प्रवासात पन्नास टक्के बचत केल्याच्या प्रति त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच सौ.प्रणिताताई यांनी केंद्र सरकार व राज्य सरकार राबवत असलेल्या योजनांची माहिती सर्व प्रवाश्यांना दिली.यावेळी समवेत शिवसेना तालुका प्रमुख बालाजी पाटिल कबनुरकर,डॉ.शारदाताई हिमगिरे,
इसाक तांबोळी,बजरंग कल्याणी,सचिन रिंदकवाले,रवी गंदपवाड,सतीश डाकूरवार,आकाश पाटिल केरूरकर,बाबुराव पाटिल जांभळीकर,मारुती पाटिल आमणर,रावसाब पाटिल माकनिकर,पवन पोतदार,नामदेव शिंदे,गजानन लोखंडे,ज्ञानेश्वर डोईजड यांच्या अनेक प्रवाशी उपस्थित होते.