दैनिक चालु वार्ता ग्रामीण तालूका प्रतिनिधीः-माणिक सुर्यवंशी.
———————————————–
देगलूर( दि.१9) देगलूर तालुक्यात आवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फेरले असून आजघडीला अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये रब्बीचे पीक असून शेतकरी मात्र खुप मोठ्या संकटात सापडला आहे.
सद्याची परिस्थिती पाहता आंब्याच्या झाडाला आंबे लागत आहेत,चिंचाच्या झाडाचे चिंच काढण्यास सुरुवात झालेली आहे, अनेक शेतकरी भाजीपालाच्या जिवावर आपल्या संसाराची रंगरंगोटी करीत आहे तर काही शेतकरी आपल्या शेतात रब्बीचे पीक घेत आहेत तर काही शेतकरी फुले लावून आपली उपजिवीका भागवत आहेत. तरीसुद्धा अशा परिस्थितीमध्ये शेतकरी आपले उदरनिर्वाह चालवत असताना मात्र अवकाळी पावसाच्या अवकृपणे शेतकऱ्याचे स्वप्न भंग होत आहेत.
मागील वर्षीच्या खरीप हंगामापासून सततच्या पावसामुळे अनेकांची सोयाबीन पावसामुळे गेली तर तुर पावसामुळे अगोदरच जळून गेले व असलेल्या तुरीला धुवारी नावाच्या रोगाने गिळंकृत केल्यामुळे तुरीचे उत्पादन कमी झाले.त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी रब्बीच्या पिकावर जोर दिले मात्र हरभरा करडी सुद्धा दरवर्षीच्या तुलनेत कमीच उत्पन्न निघाल्यामुळे शेतकरी मात्र डबघाईला आलेला आहे.
सलग तीन दिवसापासून आवकाळी पावसामुळे शेतीमधील पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. परंतू शासन याची दखल घेऊन तात्काळ शेतकऱ्यांना दिसाला देईल का ? सद्याची परिस्थिती पाहता एकच मिशन जूनी पेन्शन या बेमुदत संपामुळे जसे शासन गांभीर्याने विचार करीत आहे,त्याच पद्धतीने शेतकऱ्यांचे विचार प्रशासन करील का ? यावेळी प्रशासन फक्त शेतकऱ्यांचे डोळे पुसन्याचेच काम करणार का ? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित राहणार आहेत.
