
दैनिक चालु देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे.
देगलूर:देगलुर बिलोली मतदार संघाचे लाडके आमदार जितेश भाऊ अंतापुरकर आज देगलूर येथील तहसील ऑफिस समोर बसलेल्या जुनी पेन्शन संपाच्या ठिकाणी जाऊन भेट देऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या व संपकऱ्यांना आश्वासन दिले की मी चालू अधिवेशनामध्ये आमदार खासदारांची पेन्शन बंद करा पण कर्मचाऱ्यांची पेन्शन लागू करा असे मी चालू अधिवेशनामध्ये अध्यक्षांना विनंती केली या संपला माझा पाठिंबा आहे असे जाहीर केले. त्यांनी सांगितले भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसचे सरकार आहे त्या त्या राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना ही लागू आहे .
पण बीजेपी सरकार हे नेहमी प्रमाणे कर्मचाऱ्यांच्या विरोधात निर्णय घेऊन ही जुनी पेन्शन देण्यास टाळाटाळ करत आहे त्यासाठी मी या जुनी पेन्शन योजनेसाठी सतत पाठपुरावा करून जुनी पेन्शन योजना कर्मचाऱ्याला देईपर्यंत शांत बसणार नाही असे सांगितले देगलूर बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश भाऊ अंतापुरकर यांनी संपातील सर्व कर्मचाऱ्यांना माझा जाहीर पाठिंबा आहे असे सांगितले.