
दैनिक चालू वार्ता राजगुरूनगर ता. प्रतिनिधी- मयुरी वाघमारे.
========================
राजगुरूनगर :- मंचर, ता. आंबेगाव, जि – पुणे.
आज दिनांक 19 मार्च रविवार रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत नगरपंचायत पटांगण, मंचर ता. आंबेगाव या ठिकाणी धर्मवीर छत्रपती. श्री. संभाजी महाराज यांच्या बलिदान मासनिमित्त ह्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिरात मंचर, राजगुरूनगर येथील अनेक तरुण, तरुणीनी आपली उपस्थिती दर्शवली आहे. रक्तदान केल्याने दुसऱ्या एका व्यक्तीला जीवनदान मिळू शकते. तसेच रक्तदान हे एक श्रेष्ठ दान आहे असे समाज प्रबोधन त्या ठिकाणी करण्यात आले. अनेकदा रक्ताचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने कित्येकांचा मृत्यू ही होतो. कोरोना मुळे मागील काही दिवस वैद्यकीय यंत्रणेला रक्ताचा तुटवडा जाणवात आहे. त्या मुळे आशा रक्तदान शिबिरान मुळे रक्ताचा पुरेसा साठ उपलब्ध होईल.
शुभशिर्वाद :- आदरणीय गुरुवर्य. श्री. संभाजीराव भिडे गुरुजी.
या रक्तदान शिबिरात प्रत्येक रक्तदात्यास वर्षभरात एक रक्ताची पिशवी, तसेच भेटवस्तू देण्यात आली आहे.
उपस्थित मान्यवर :- मानव रक्षक संघ संलग्न पोलीस मित्र समिती संस्थापक अध्यक्ष गणेश शिंदे, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष सुरज येवले, पुणे जिल्हा युवती अध्यक्ष भक्ती बोऱ्हाडे, उपाध्यक्ष ऋतुजा शेवाळे, महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र समिती खजिनदार वैभव वाघमारे, कार्यध्यक्ष आशितोष मांजरे, सचिव श्रेयस आगलावे, मंचर शहर युवक अध्यक्ष संतोष धोत्रे.
आयोजक :- मानव रक्षक संघ संलग्न पोलीस मित्र समिती महाराष्ट्र राज्य.
रक्तदान हेच श्रेष्ठ दान……….