
दैनिक चालु वार्ता ग्रामीण प्रतिनिधी -माणिक सूर्यवंशी .
दि.२२ मार्च, २०२३ रोजी मौजे नवीन थडीसावळी,ता.बिलोली;जि.नांदेड येथे नवीन जामा-मस्जिदचे लोकार्पण समारंभ थाटामाटात संपन्न झाले.
मागच्या काही वर्षांपासून हे बांधकाम सुरू होते,ते आज पूर्णत्वास जाऊन रमज़ान मासारंभापूर्वी थडीसावळी येथील मुस्लिम बांधवांसाठी लोकार्पित करण्यात आले.
थडीसावळी गावात आजपर्यंत मुस्लिम बांधवांसाठी नमाज अर्पण करण्यासाठी मस्जिद अस्तित्वात नव्हती. बोधनचे रहिवासी शेख हमीद भाई(सद्या हैदराबाद), शेख शकील भाई,निझामाबाद, इलियास भाई हैदराबाद यांच्या वैयक्तिक सहयोगाने सदरील जामा-मस्जिदचे बांधकाम पूर्णत्वास गेले आहे.
दैनंदिन जीवनात प्रपंच करताना थोडासा परमार्थ साधने हे प्रथम कर्तव्य आहे. थडीसावळी जामा-मस्जिद चे अध्यक्ष सय्यद आजम मिस्ञी आणि उपाध्यक्ष अब्दुलसाब शेख ह्यांचाही बांधकामात मोलाचा सहभाग राहिला आहे. मस्जिद बांधकामामुळे स्थानिक मुस्लिम बांधवांना नियमित नमाज पठण करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. गावातील लहान मुलांना धार्मिक शिक्षण मिळणे सुकर झाले आहे. बर्याच दिवसांपासून रेंगाळत पडलेला जामा-मस्जिद बांधकामाचा प्रश्न सुटल्यामुळे स्थानिक मुस्लिम नागरिकांसह सर्वजण आनंदित झाले आहेत.
सदरील कार्यक्रमास संरपंच शिवचंदन अनपलवार,उपसरपंच वीरेंद्रसिंह चौहान, माजी सभापती व्यंकटराव पांडवे,माजी सभापती प्रतिनिधी तथा सरपंच गंगाधर अनपलवार, मौजे आदमपूर चे माजी सरपंच तथा विद्यमान चेअरमन अंबादास शिनगारे,मोहन काळे तंटामुक्त अध्यक्ष, सदस्य रविंद्रसिंह चौहान, माजी उपसरपंच अशोक मुदिराज,सामाजिक कार्यकर्ते जयराम भंडारे,रास्त भाव दुकानदार गुलाबसिंह चौहान, महमदरफी मदार,सहाय्यक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, युवराजसिंह चौहान, बाबु बोगुलवार,भास्कर भंडारे, शिवदानसिंह ठाकूर,शंकर मुदिराज,
मारोतीअप्पा मठपती,शिवसांब मठपती,यादव कांबळे,
गौसोद्दीन कुरेशी,माजी नगराध्यक्ष,बिलोली,ए.जी कुरेशी पञकार तथा माजी सभापती,माध्यम प्रतिनिधी पञकार सय्यद रियाज,मुजीब पटेल डौरकर,
कवी,गीतकार, पञकार जाफर आदमपूरकर, हैदरसाब शेख,कासिमसाब शेख, बाशुसाब शेख,रब्बानी शेख,मोसिम मदार,रियाज मदार,शमशोद्दीन शेख,इस्माईल शेख,महेबुब शेख,अहेमद शेख,अफसर शेख,
मुसा आक्रम हाफिज, आक्रम हाफिज, नदीम हाफिज आदी मान्यवर तथा मुस्लिम बांधवांची विशेष उपस्थिती होती. आभार प्रदर्शन महमदरफी मदार यांनी केले.