
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
नांदेड:- नांदेड जिल्हातील गाव ग्रामपंचायत ते सर्व तहसिल, सर्व पं.स.,सर्व पोलिस स्टेशन व इतर सर्व कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून गोरगरिब जनतेचा आर्थिक, मानसिक, शारिरिक होणारा खेळ बंद करून देण्यासाठी आपल्याकडून सक्तीचे आदेश देवून बायोमॅट्रिक मशिन व सि.सि.टि.व्ही कॅमेरे तात्काळ बसवून त्याची अंमलबजावणी करुन देण्यात यावे अन्यथा आम्ही नाईलाजास्तव जनहितासाठी लोकशाही पध्दतीने विभागीय आयुक्त कार्यालयापुढे बेमुदत आमरण उपोषणास बसु असे निवेदन सामाजिक कार्यकर्ते व्यंकटी गोविंद जाधव यांनी मा. जिल्हाधिकारी साहेब नांदेड,मा.पोलीस अधिक्षक नांदेड, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे दिले आहे.