दैनिक चालु वार्ता राजगुरूनगर ता. प्रतिनिधी- मयुरी वाघमारे.
========================
राजगुरूनगर :- ता. खेड, जि, पुणे. आज दिनांक 23 मार्च गुरुवार रोजी
भारतमातेचे सुपुत्र, महान क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना शहीद दिनानिमित्त विनम्र अभिवादन. 23 मार्च 19 31 रोजी भगतसिंग, सुखदेव, राजगुरू हे क्रांतिकारक लाहोरचा तुरुंगात हसत हसत फासावर गेले. या विरपुत्राणी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात बलिदान दिले.
क्रांतिकारक राजगुरू यांचे जन्म गाव म्हणजे राजगुरूनगर आणि राजगुरू यांचा राजगुरू वाडा हा राजगुरूनगर वासियांचे प्रेरणा स्थान आहे. आज या शहीद दिनानिमित्त राजगुरूनगर वाडा या ठिकाणी अनेक उपक्रम, कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रम रूपरेषा :- ध्वजारोहण सकाळी 10. 5 वा.
रक्तदान शिबीर – सकाळी 9 ते 5
विश्व हिंदू परिषद बजरंग दल, खेड प्रखंड प. महाराष्ट्र आयोजित हुतात्मा दिन ” क्रांतिजागर “.
ठिकाण – हुतात्मा स्मारक ते हुतात्मा राजगुरू वाडा, राजगुरूनगर.
या ठिकाणी 40 गावांमधून आलेली मशाल मिरवणूक, राजगुरू – भगतसिंग – सुखदेव पदनाट्य, भव्य तिरंगा पदयात्रा, भारत वर्षातील नारी शक्ती जिवंत देखावा. इत्यादी उपक्रम सायं 4 ते 7:33 या वेळेत आयोजित करण्यात आले.
शहीद दिनानिमित्त राजगुरूवाड्या मध्ये योग प्राणायाम शिबीर घेण्यात आले. माजी खासदार शिवाजी दादा आढळराव साहेब यांनी राजगुरू, भगतसिंग, सुखदेव यांच्या स्मृती शिल्पाना अभिवादन केले. राजगुरू वाडा येथे महाराष्ट्र केसरी पै. शिवराज राक्षे यांच्या कडून हुतात्मा राजगुरू यांच्या जन्मस्थळी ध्वजारोहन व शहीदाना अभिवादन करण्यात आले.
तसेच या ठिकाणी हवन कार्यक्रम करण्यात आला. शहीद दिनानिमित्त एक आगळी वेगळी आदरांजली मनून आज 23 मार्च गुरुवार बलिदान दिन मनून जाणीव परिवार आयोजित ज्ञानदीप वाचनालंय, राजगुरूनगर वेबसाईट वाचकार्पण सोहळा ठीक संध्याकाळी 7 वाजता आयोजित केला गेला.
विशेष सहकार्य :- सार्वजनिक वाचनालंय राजगुरूनगर.
या दिवस भर चालू असणाऱ्या उपक्रमामध्ये इन्कलाब झिंदाबाद अशा घोषणा देण्यात आल्या.
अनेक मान्यवरानी आज या ठिकाणी येऊन हुताम्याना अभिवादन केले.
आयोजक :- हुतात्मा राजगुरू स्मारक समिती, नगरपरिषद राजगुरूनगर.
