दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी-बाजीराव गायकवाड.
कंधार/कुरुळा: कंधार तालुक्यातील कुरुळा हे गाव लोकसंख्येच्या आणी व्यापार बाजार पेठेच्या बाबतीत मोठे नाव असलेले गाव आहे पण सध्या अनेक समस्या गावात आहेत त्याच संदर्भात भाजपा युवा नेते राजीव पाटील मुकनर आणी माणिक ढवळे यांनी जिल्हाधिकारी साहेबाना निवेदन देऊन चर्चा केली.मा. नांदेड जिल्हाधिकारी अभिजित राऊत सर यांना कुरुळा गावातील प्रमुख रस्त्यासंदर्भात चर्चा केली
गावाची लोकसंख्या व प्रमुख बाजारपेठ पाहता
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते हिप्परगा रोड वरील अनिधिकृत बांधकाम काढून रस्ता करावा यासाठी आपण यात लक्ष घालावे
सदरील रोड साठी 1कोटी 73 लक्ष रुपये मंजूर असून त्याची ऑर्डर सुद्धा निघाली आहे पण प्रत्यक्षात काम होत नसल्याने गावकऱ्याच्या मनात तीव्र असंतोष आहे त्यामुळे आपण या रोड वरील अनधिकृत रित्या असलेले बांधकाम पाडून तो रोड खुला करावा यासाठी संबंधित विभागाला आदेश द्यावेत या आशयाचे निवेदन दिले असता जिल्हाधिकारी साहेबांनी उपविभागीय अधिकारी मंडलिक साहेब व तहसीलदार साहेब यांना निवेदनाचा आशय घेऊन त्यांच्या सोबत चर्चा केली व हे प्रकरण लवकरात लवकर निकाली काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
