
दैनिक चालू वार्ता लातूर जिल्हा उपसंपादक- मारोती बुद्रुक पाटील.
अहमदपूर येथील शहीद दिनाचे औचित्य साधून शहिद भगतसिंग सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 101 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
आज दि. 23 मार्च रोजी शहीद दिनाचे औचित्य साधून शहीद भगतसिंग सामाजिक प्रतिष्ठाण व भालचंद्र ब्लड बँकेच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 101 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या शिबिराचे उद्घाटन उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी यांनी केले.यावेळी प्रमुख पाहुणे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश बंकवाड, दुरपडे माजी नगरसेवक चंदू भाऊ पुणे पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. विश्वंभर स्वामी राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मीनाक्षीताई शिंगडे, सिनेट सदस्य प्रा. विनोद माने.पत्रकार संघाचे सचिव शिवाजीराव गायकवाड उपाध्यक्ष प्रा.मारोती बुद्रुक पाटील,ऍड निखिल कासनाळे सेवा सोसायटीचे संचालक सोमनाथ पुणे आदि आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी म्हणाले की शहीद भगतसिंग प्रतिष्ठान हे
सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक अध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असुन शहीद भगतसिंग प्रतिष्ठानने आज शहीद दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे ही सगळ्यात मोठी सामाजिक बांधिलकी आहे.रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचे सांगून शहीद भगतसिंग, सुखदेव,राजगुरू यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले त्यांच्या बलिदानामुळेच आपण आज स्वातंत्र्याची फळे चाखत आहोत त्यांच्या आठवणी कायम स्मरणात राहाव्यात म्हणून आज प्रतिष्ठानच्या वतीने केलेले कार्य निश्चितच बहुमूल्य आहे.
यावेळी प्रा विश्वंभर स्वामी बोलताना म्हणाले की या प्रतिष्ठानचे युवक प्रत्येक सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देऊन काम करतात कोरोनाच्या काळातही किट वाटप करण्याचे काम केले, अनेक जयंती महोत्सव आणि उत्सवात अन्नदान करण्याचे काम करतात त्यांचा हा उपक्रम स्तुत्य असतो असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धीरज शेटकर यांनी केले तर आभार धनंजय बोराडे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानचे शंकर गिरी,सुरेंद्र बेंबडे, सुरज काबळे, भुशन काबळे, वैजनाथ होनराव, परशुराम सुरनर, सुनील सुरकुटे, सचिन पाटील, सुशील पांचाळ, सुरेंद्र बेंबडे महालिंग पुणे, सोमनाथ पुणे, अजित हल्लाळे, पंकज पांचाळ,नवनाथ पुणे , भागवत सुर्यवंशी , प्रकाश शिंगडे ,संतोष काडवदे, प्रताप गवळी गोविंद सुडे, अनंत पडगे,अंगद जाधव, वसंत शिंदे, जगरूप कराड प्रंशात कदम, प्रकाश कजेवाड,राम पाटील,शिवकुमार बेद्रे,अच्युत शेळके , सचिन पाटील, देवानंद गोरे यानी सहकार्य केले.