
दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी – शिवकुमार बिरादार
मुखेड येथे विहिंप व बजरंग दलच्या वतीने गुढीपाडवा निमित्त
भव्य शोभायात्रा उत्साहात संपन्न
मुखेड. हिंदु नववर्ष निमित्त विश्व हिंदु परिषद व बजरंग दल च्या वतीने मुखेड शहरात दरवर्षी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात येते याही वर्षीही हिंदु नववर्ष निमित्त गुढीपाडवा दि. २२ मार्च २०२३ रोजी भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
या शोभायात्रेचे डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज , माजी नगराध्यक्ष गंगाधरराव राठोड, भाजप नेते व्यंकटराव लोहबंदे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक गजलवाड, राम सावकार पत्तेवार, माजी नगराध्यक्ष अनिल जाजू, बजरंग दल जिल्हा महामंत्री बजरंग पांचाळ, भाजप शहराध्यक्ष किशोरसिंह चौहान, विश्व हिंदू परिषद जिल्हा सहमंत्री संजय वाघमारे, महेश मुक्कावार, बजरंग दल तालुका संयोजक शंकर नाईनवाड, साई बोईनवाड, बजरंग कल्याने, संदीप बादेवाड, ज्ञानेश्वर डोईजड, विनोद दंडलवाड, शिवा दारेवाड, विनोद रोडगे, नीतीन टोकालवाड, अमोल मडगुलवार, शिवा समराळे, राजेश गजलवाड,करण रोडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुखेड नगरीचे कुलदैवत श्री वीरभद्र स्वामी व भगवान रामचंद्र ची आरती करण्यात आली.
सकाळी ११ वाजता राम राज्य ग्रुप च्या वतीने शहरातून भव्य मोटासायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीस उत्स्फर्तपणे प्रतिसाद मिळाला. यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख नागनाथ लोखंडे, शहरप्रमुख शंकर चिंतमवाड, आकाश दरेगावे, जयप्रकाश कानगुले, नागेश लोखंडे निखिल कुंभार , योगेश पाळेकर, योगेश कामघंटे, प्रशांत यादव यांच्यासह हजारो दुचाकीस्वार, ऑटो, पिकअप स्वारांनी सहभाग नोंदविला होता.
तर सायंकाळी ४ वाजता मान्यवरांच्या हस्ते आरती करून श्री वीरभद्र स्वामी येथून शोभायात्रेस सुरुवात करण्यात आली. या शोभायात्रेत सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील तलवारबाजी , साहसी खेळ, रुद्रुर येथील हलगी बाजा तर विशाखापट्टणम येथील देवी देवतांचे देखावे, साहसी कला व विविध देखावे सादर करण्यात आले.
या यात्रेत मुखेड तालुक्यातील आजूबाजूच्या परिसरातील , शहरातील हजारो हिंदू बांधव सहभागी झाले होते. या शोभाात्रेतील देखावे व कला पाहून मुखेडकरांच्या डोळ्याने पारणे फिटले असल्याचे दिसत होते. या रॅलीत जय श्रीराम चा घोषणेने शहर दुमदुमल्याचे दिसून आले. शहरात सर्वत्र भगवेमय वातावरण दिसून आले . हिंदू नववर्षाच्या निमित्ताने सर्वत्र रांगोळी टाकून गुढी उभारून गुढीपाडवा सुद्धा उत्साहात साजरा करण्यात आला. ही रॅली यशस्वी करण्यासाठी अनेक राम भक्तांनी सहकार्य केले तर पोलीस निरीक्षक रमेश वाघ, पोलीस उपनिरीक्षक गजानन अन्सापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
ही शोभायात्रा वीरभद्र स्वामी मंदिर येथून विठ्ठल मंदिर, राम मंदिर, जुने पोलीस स्टेशन, बालाजी मंदिर , बसस्थानक , छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते तागलाईन अशी काढण्यात आली. तर शिवसेना शहरप्रमुख बजरंग कल्याने यांच्या वतीने शोभा यात्रेवर पुष्पवृष्टी करण्यात आली.