
दैनिक चालु वार्ता आष्टी प्रतिनीधी –
आष्टी(श)(वर्धा) : तालुक्यातील साहूर शेत शिवारात अवैध मार्गाने सोने खरेदी करणाऱ्या फिर्यादीस आरोपीने संगनमताने लाथा बुक्क्यांनी मारहाण करून रोख रक्कम २ लाख रुपये व ३ अँड्रॉइड मोबाईल पळून नेल्याच्या प्रकरणात आष्टी पोलिसांनी कारवाई करत आरोपींना ताब्यात घेत रोख रक्कमेसह संपूर्ण मुद्देमाल जप्त केला याप्रकरणी अपराध क्र.७३/२०२३ भादवी ३९५ अन्वये आष्टी पोलिसानी गुन्ह्याची नोंद केली आहे याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, फिर्यादी नागपूर रहिवासी(जुनी अजनी) ऑटो चालक श्रीकृष्ण धूर्वे व त्याचे २ मित्र यांना आरोपींनी कमी दरात सोने देतो असे प्रलोभन दाखवत साहूर शेत शिवारात नगदी रोग रक्कम घेऊन येण्यास सांगितल्याप्रमाणे फिर्यादी ठरलेल्या ठिकाणी रोख रक्कम घेऊन आले असता आरोपींनी फिर्यादींना मारहाण करत २ लाख रुपये व ३ अँड्रॉइड मोबाईल हिसकावून पळ काढला होता या प्रकरणी फिर्याद दाखल होतात आष्टी पोलीसानी अवघ्या १२ तासात आरोपीचा शोध घेत आरोपी सच्चाई सोलंकी (२३) आकाश भोसले (२६) आतेश भोसले (२२) सर्व रा. बोरगाव(टू) तर वर्धपुर येथील आदित्य ब्राह्मणे (२३) यास अटक केली यात गुन्ह्यात चोरी गेलेले एकूण २ लाख १५ हजार रुपयाचे ३ अँड्रॉइड मोबाईल असे जू. काँ.२१५००० रू. माल जप्त केला सदर कारवाई वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक नूरूल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कवडे,आर्वी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांचे मार्गदर्शनात ठाणेदार लक्ष्मण लोकरे यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात पो.उप. निरीक्षक अनिल देरकर, पो.उप. निरीक्षक आजिनाथ दौड, पो.हेड.काँ. अमीत जूवारे गजानन वडनेरकर नापोकाँ राजेश पाटील, पो. काँ. मंगेश भगत, सचिन ढाले, बालाजी सांगळे, रोशन दाहे, संजय बोकडे यांनी केली असून पुढील तपास पो.उप. निरीक्षक अनिल देरकर करीत आहे याबाबतीत सर्वप्रथम दै.चालू वृत्त प्रकाशित केले होते हे विशेष