
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भू म:- AISF शाखा ईट तर्फे गेल्या 12 वर्षांपासून संत तुकाराम महाराज, छत्रपती संभाजी महाराज व भगतसिंह, राजगुरू, सुखदेव ह्यांच्या शहीद दिनानिमित्त आपण ईट शहरात विविध सामाजिक कार्यक्रम आणि रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत आहे.
दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी जगद्गुरू तुकाराम महाराज, छत्रपती संभाजी महाराज, क्रांतिकारक शहिद भगतसिंह, शहिद राजगुरू, शहिद सुखदेव ह्यांच्या शहिद दिनानिमित्त AISF शाखा ईट तर्फे भव्य असे रक्तदान शिबिर आयोजन केले होते भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले प्रथम शहिदांना अभिवादन करून AISF जिल्हा उपाध्यक्ष कॉ. अशोक माने यांनी आपले थोडक्यात मनोगत व्यक्त केले. त्यांनंतर आभार प्रदर्शन करून . नंतर ब्लड कॅम्प ला सुरुवात केली या शिबिरामध्ये 42 रक्तदात्यांनी रक्तदान करून शहिदांना श्रद्धांजली अर्पित केली
ह्या संपूर्ण कार्यक्रमासाठी उपस्थिती पत्रकार बंधू सोमेश्वर स्वामी, समाधान डोके, फैसल भैया काझी माजी जिल्हा परिषद सभापती अण्णासाहेब देशमुख ग्रामपंचायत सदस्य प्रवीण भैया देशमुख उपसरपंच प्रमोद देशपांडे सदस्य-सयाजी हुंबे, युवा सेना निलेश चव्हाण फकीरादल अध्यक्ष बाबासाहेब थोरात स्वाभिमानी- अनंत डोके, समाधान हाडोळे, ईश्वर देशमुख मेघराज देशमुख संदिपान कोकाटे सर अक्षय काळखैर अशोक माने तसेच व्यापारी बंधू गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, AISF जिल्हा उपाध्यक्ष- अशोक माने, कोषाध्यक्ष क्रांतिसिंह राऊत , ईट शहराध्यक्ष- मयूर पवार उपाध्यक्ष- प्रेम भागवत, माअध्यक्ष- बाळासाहेब हुंबे, पुरुषोत्तम चव्हाण, सुरज वेदपाठक, विकास खवळे, आयुब शेख, , तसेच गावातली कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.आयोजक ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन शाखा- ईट कॉम्रेड अशोक युवराज माने यांनी सर्वांचे आभार मानले.