
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी -नवनाथ यादव
भूम:- महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत साहेबयांचा मार्गदर्शनाखाली रुग्णास तत्काळ मदत करण्यात आली.उदय अरुण बावकर रा पाथरूड याचा अपघात झाला असता याला सुविधा हॉस्पिटल बार्शी येथे वैद्यकीय उपचार करता ऍडमिट केले होते, सदरील हॉस्पिटल ने रुग्णास रुग्णास सत्तर हजार रुपये खर्च येऊ शकतो असे सांगितले, बावकर कुटुंबीयांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पांडुरंग धस यांच्याशी संपर्क करून सर्व माहिती सांगितली धस यांनी तत्काळ दखल घेऊन महात्मा फुले जन आरोग्य योजने मधून उपचार व वैद्यकीय खर्च मोफत मिळवून दिला
याबद्दल उदय बावकर यांनी दमदार लोकप्रिय आरोग्यमंत्री डॉ. तानाजीराव सावंत साहेब तसेच युवा नेते ऋतुराज भैय्या सावंत, साहेब ,विशेष वैद्यकीय कार्यकारी अधिकारी डॉ जितेंद्र डोलारे सर, वैद्यकीय मदत अधिकारी .डॉ.रविंद्र अनभुले सर, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पांडुरंग धस, तालुका संघटक वैजिनाथ म्हमाने,उपजिल्हाप्रमुख युवा सेना युवराज भाई हुंबे, विद्याधर बोराडे ,सुनील खुणे, यांनी तत्पर दखल घेऊन हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना सूचना दिल्या,व तातडीने मदत केल्याबद्दल बावकर कुटुंबियांनी मंत्रीमहोदय साहेब व अधिकारी, पदाधिकारी वर्ग, यांचे विशेष आभार मानले. व पुढील आरोग्यसेवेस शुभेच्छा दिल्या व मनपूर्वक आभार मानले.