
दैनिक चालु वार्ता अहमद्पुर प्रतिनिधी -विष्णु मोहन पोले.
लातुर/अहमद्पुर: अहमद्पुर -चाकूर तालुक्यातील अनेक गावातील विकास कामासाठी भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लातुर जिल्हाचे पालकमंत्री गिरीश महाजन,भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कडे ग्रामीण भागातील विकास कामासाठी मागणी केली होती त्या मागणीला मंजूरी देण्यात आली.गणेश हाके यांनी ज्या गावासाठी निधी मंजूर करून आणलं ती गावे पुढील प्रमाणे -सांगवी सु.(सिमेंट रस्ता 10लक्ष)सुमठाणा -सिमेंट रस्ता 10लक्ष.गंगाहिप्परगा -सिमेंट रस्ता.मांगदरी -10लक्ष सिमेंट रस्ता.शिंदगी खु.-10लक्ष सिमेंट रस्ता.गुंजोटी-10लक्ष.सिमेंट रस्ता.माकणी -चिलगरवाडी-10लक्ष.सिमेंट रस्ता.विळेगाव-10लक्ष.सिमेंट रस्ता.रुद्धा -10लक्ष .पेव्हर ब्लॉक बसविणे,हळणी-10 लक्ष. सिमेंट रस्ता.लेंडेगाव -10लक्ष .सिमेंट रस्ता .धसवाडी-10लक्ष सिमेंट रस्ता.तर चाकूर तालुक्यातील मांडुरकी-10लक्ष सिमेंट रस्ता.अजनसोन्ड-भाकरवाडी-10 लक्ष सिमेंट रस्ता.बोथि-10लक्ष.सिमेंट रस्ता.कल्कोटी-10लक्ष.सिमेंट रस्ता.येणगेवाडी -10लक्ष.पेवर ब्लॉक बसविणे,हनमन्त्वाडी-10लक्ष .सिमेंट रस्ता.मसनेरवाडी -10लक्ष .सिमेंट रस्ता.नागेशवाडी. इत्यादी गावामध्ये गणेश हाके पाटील यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर झाला त्यामुळे सर्व गावातील गावकरी यांच्या तर्फे गणेश हाके यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.
सध्या महाराष्ट्रात भाजप-सेना युतीच सरकार आहे त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीच जीवनमान कस उंचावेल यासाठी कार्य करतंय. माझ्या कार्यकर्त्यांच्या,ग्रामीण भागातील नागरिकांच्या ज्या विकासकामासाठी मागण्या होत्या त्या मी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,पालकमंत्री, यांच्या कडे मांडल्या आणी मंजूर करून आणल्या .यापुढे पण अनेक निधी ,प्रकल्प तालुक्यात आणण्याचा माझा प्रयत्न असेल.
गणेश दादा हाके पाटील.प्रदेश प्रवक्ते भाजपा.