
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे.
देगलूर: बिलोली तालुक्यातील सगरोळी येथिल पत्रकार
यादवराव लोकडे यांच्या पत्नीचे 5 तोळ्याचे सोन्याचे दागिने कपाटातुन चोरी गेले असल्याने सदर ची तक्रार बिलोली पोलीस ठाण्यात करताच सदर चोरीला गेलेली दागिने फिर्यादीच्या घरात आणून टाकले असल्याने गावात एकच खळबळ माजली आहे.
सविस्तर वृत्त असे की, पत्रकार यादवराव लोकडे यांच्या
पत्नीच्या गळ्यातील गंठण हार 36 ग्रॅम वजनाचे व
नेकलेस 15 ग्रॅम वजनाचे असे एकूण 5 तोळे 1 ग्रॅम
वजनाचे दागिने चोरीला गेले असल्याचे उघडकीस झाले
होते. सदर प्रकरणात शेजारी राहणा-या 12 वर्षाच्या
मुलीने बिलोली पोलीस ठाण्यात दागिने चोरी केले
असल्याचे कबुली दिली होती.
व दागिने व डब्याचे वर्णन सुद्धा सांगितले होते. मात्र सदर मुलीचे आई वडील व नातेवाईक मात्र सदर दागिने आमच्या घरात नाहीत अशी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने या कुटुंबियांची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी बिलोली पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.सदर प्रकरणी गुन्हा दाखल होताच या फिर्यादीच्या पलंगाखाली दुसऱ्याच दिवशी सकाळी दागिण्याचा डब्बा जशास तसे आणून टाकले असल्याचे दिसून आले. ही माहिती पोलीसांना तात्काळ दिली असता पोलीस अधिकारी आंबेवार, जळकोटे व इतर कर्मचारी जायमोक्यावर येऊन पंचनामा करून मुद्देमाल ताब्यात घेतले. मात्र सदर सोन्याचे दागिने चोरीला गेल्यानंतर घरात सर्वत्र शोधाशोध करून सुद्धा माल दिसत नव्हता.
मात्र गुन्हा दाखल होताच सदर मुलीने चोरी केलेली कबुली व्हिडिओ रेकॉर्ड मध्ये पोलिसांना दिलेली असताना सुद्धा सदर दागिने घरात कसे आढळून आले? यामध्ये आरोपी आपली चोरी फिर्यादीच्याच अंगावर टाकण्यासाठी हा डाव आखला का? मुलीच्या घरातील दागिने फिर्यादीच्या घरात पलंगाखाली तेही गुन्हा दाखल होताच आले कसे?
या सर्व बाबींची चौकशी पोलीस प्रशासनाने करावी अशी मागणी फिर्यादीच्या वतीने बिलोली पोलीसांकडे करण्यात आली आहे.
या एकंदरीत घटनाक्रमावरून जर फिर्यादी ने गुन्हा दाखल केला नसता तर सदर चोरीला गेलेला मिळाला नसता अशी चर्चा गावात रंगत आहे.