
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर प्रतिनिधी :भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुलजी गांधी यांना द्वेषभावनेतून झालेली अटक आणि केंद्र सरकारच्या हुकुमशाही प्रवृत्ती विरोधात देगलूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जेल भरो आंदोलन करण्यात आले. पोलीस स्टेशन देगलुर हद्दीत दिनांक 25.03.2023 रोजी सकाळी 11.30 ते 11.50 वा दरम्यान कांग्रेस आय पार्टी ता .देगलुरच्या वतीने .खा. राहुल गांधी यांची खाजदारकी रद्द झाल्याचे निषेधार्थ काँग्रेस नेते शिवाजीराव पाटिल बळेगांवकर, व आमदार जितेश भाऊ अंतापुरकर यांच्या मातोश्री शितलताई, शंकर कंतेवार, अँड. प्रीतमकुमार देशमुख माजी नगराध्यक्ष मोगलाजी अण्णा शिरसेटवा.र शंकर अण्णा कंतेवार जनार्दन बिरादार मिसाळे सर पिंटू पाटील आचेगावकर अजय वानखेडे ,निवरती कांबळे ,जयवर्धन कांबळे यांच्या नेतृत्वाखाली 50 ते 60 कार्यकर्ते हे अण्णाभाऊ साठे चौक देगलुर या ठिकाणी जेलभरो आंदोलन करण्याच्या तयारीत असताना एकुण 55 लोकांना कलम 68 ते,69 प्रमाणे ताब्यात घेवुन ताकीत देऊन सोडुन देण्यात आले तसेच सदर मागण्याचे निवेदन पोलीस स्टेशन देगलुर येथे देण्यात आले यावेळी योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात आले होते .