
दैनिक चालु वार्ता कळंब प्रतिनिधी -समीर मुल्ला
तालुक्यातील मस्सा ख.येथे मोहा मस्सा शिवारातील एका विहिरीत एक व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याविषयी सविस्तर वृत असे की, मस्सा खं व मोहा गावाच्या शिवेवर मस्सा खं शिवारातीलल गट नंबर 388 मध्ये तजुबाई गोविंद सावंत यांची शेतजमीन आहे. या शेतातील विहिरीत पुरुष जातीचा एक मृतदेह आढळून आला आहे. शेतात राहणाऱ्या रामलिंग माने माळी या वयोवृद्ध शेतकऱ्याला विहिरी जवळून जात असताना दुर्गंधी आली. यानंतर त्यांनी जवळ जाऊन विहिरीत पाहिले असता विहिरीमध्ये त्यांना पुरुष जातीचा मृतदेह तरंगत असल्याचे आढळून आले.
त्यानंतर त्यांनी याची मस्सा खं येथील पोलीस पाटील भास्कर शिंदे यांना तात्काळ माहिती दिली. पाटील यांनी घटना कळंब पोलीस ठाण्यास कळवली. त्यानंतर ही माहिती समजतात पोलीस स्टेशन कळंबचे ए .पी.आय नेहरकर,बिट आमदार बाळासाहेब तांबडे, पो. ना गणेश वाघमोडे यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत सदरील घटनास्थळी पंचनामा केला.
मृतदेह बाहेर काढताना कसरत करावी लागली…
साधारणतःअंदाजे पंचेवीस फूट खोलीच्या सदर विहरीत पाण्यात तरंगत असलेले प्रेत काढण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागली.दोरीच्या साह्याने शेंदून मृतदेह बाहेर काढण्यात आला.
जागीच शवविच्छेदन…
मृतदेह सडला असल्यामुळे शिवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये घेऊन जाणे अशक्य होते. यामुळे मोहा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलवुन मृतदेहाचे जागीच शवविच्छेदन करण्यात आले व व्हि.सी.आर राखून ठेवण्यात आला आहे.
प्रशासनाने केले अंत्यसंस्कार…
मृताची ओळख निष्पन्न न झाल्याने मस्सा ग्रापचे ग्रामविकास अधीकारी ए बी वाघमारे व पोलीस कर्मचारी यांनी पुढाकार घेत गावातील स्मशानातभुमीत अंत्यसंस्कार केले .मृतदेहाची ओळख न पटलेल्याने परिसरात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.पुढील तपास ए.पी.आय नेहरकर, बिट अमलदार बाळासाहेब तांबडे हे करत आहेत.