
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे.
मंठा. शेत तिथे रस्ता हे शासनाचे धोरण असतांना अंमलबजावणी खेडोपाडी होताना दिसून येत नाही. पांदण रस्त्याचा प्रश्न जटिल बनल्याने जावे तरी कुठून असा प्रश्न उपस्थित होत आहे. गाव पातळीवरील स्थानिक नेते केवळ राजकीय हेवे दाव्यातून पांदन रस्त्याची वाट लावून खिसे भरण्यासाठी कामाबाबत दिरंगाई करू लागले आहेत. शेतकरी अगोदरच सततच्या पावसाने नैसर्गिक आपत्तीने परेशान आहे अतिवृष्टी महापूर अवकाळी पाऊस गारपीट आधी संकटातून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.शेतकऱ्यांचा शेतीमाल घरापासून बाजारपेठेपर्यंत नेण्यासाठी शेतकऱ्यांना रस्त्याची सुविधा नाही त्यामुळे शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. पूर्वीचे रस्ते गाव नकाशात आहेत मात्र त्यावर जागोजागी अतिक्रमण वाढल्याने रस्ते नामशेष होऊ लागले आहेत यातूनच अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. गाव समिती गेल्या तरी कुठे दिवसेंदिवस पांदण रस्त्यासाठी रस्त्याच्या प्रकरणावर वाद वाढताना दिसत आहे राज्य शासनाने गाव पातळीवरील रस्त्याचा वाद मिटवण्यासाठी गाव समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला परंतु याबाबत गाव पातळीवरील संबंधित यंत्रणेचा निष्काळजीपणा दिसत आहे. तसेच ग्रामपंचायतीने याबाबत शासनाच्या आदेशाचे पालन करून समित्या स्थापन करणे गरजेचे आहे