
दैनिक चालु वार्ता मुखेड तालुका प्रतिनिधी -सुरेश जमदाडे
मराठी भाषा, कला, साहित्य आणि संस्कृतीच्या जतन – संवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्या ‘मायबोली मराठी परिषद’ मुखेडच्या वतीने ‘मायबोली साहित्य संवाद’चे आयोजन करण्यात आले रविवार, २६ मार्च रोजी पार पडलेल्या या आगळ्यावेगळ्या साहित्य संवादाचे उद्घाटन कथा – पटकथालेखक अरविंद जगताप यांच्या हस्ते करण्यात आले तर यावेळी लोकसाहित्याचे संशोधक डॉ. साहेब खंदारे हेअध्यक्षपदी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध सर्पदंश तज्ज्ञ डॉ. दिलीप पुंडे व विद्यमान अध्यक्ष प्रकाश पवार , गुरुवर्य गौतम बोडके मायबोली शिक्षण सेवा सन्मान मानकरी सुप्रसिद्ध बासरीवादक ऐनोद्दीन वारसी , गुरुवर्य तुळशीराम आंबुलगेकर मायबोली अक्षर सन्मान मानकरी कु. प्रणीता पोतदार हे उपस्थित होते.हा कार्यक्रम मुखेड येथील सुप्रसिद्ध जिजाऊ ज्ञानमंदिरात मायबोली दर्दी रसिकांच्या उदंड प्रतिसादात उत्साहात पार पडला.
मागच्या बारा वर्षांपासून मराठी भाषा, कला, साहित्य आणि संस्कृतीच्या जतन व संवर्धनासाठी सातत्याने कार्यरत असणाऱ्या मायबोली मराठी परिषदेने ‘मायबोली साहित्य संवाद’चे आयोजन केले होते. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचा आरंभ सिनेक्षेत्रातील ख्यातनाम कथा – पटकथाकार, कवी,गीतकार अरविंद जगताप यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थित मराठमोळ्या मडक्यांच्या उतरंडीवरील दीप प्रज्वलनाने करण्यात आली. ज्ञानोबा जोगदंड यांचे स्वरचित ‘ वसंत फुलला आला बहार’ हे स्वागतगीत जिजाऊ ज्ञानमंदिर चे संगीत शिक्षक सचिन सुर्यवंशी व कु. विनिता चव्हाण या मुलींने गायले . यावेळी मायबोली मराठी परिषदेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा दस्ती , फेटा , स्मृतिचिन्ह पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला. सकाळच्या आरंभ सोहळ्याला ११ वाजता सुरुवात झाली. प्रारंभी मायबोली मराठी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी आंबुलगेकर यांनी आपल्या प्रास्ताविकात साहित्य संवादाची भूमिका विषद केली. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध सर्पदंश तज्ज्ञ दिलीप पुंडे यांनी मायबोली परिषदेच्या कार्याची भरभरून प्रशंसा केली. समाजाला योग्य दिशा देण्यासाठी प्रबोधनाची फार मोठी भूक आहे ती भूक भागविण्याचे काम मायबोली मराठी परिषदेच्या व भिमाई व्याख्यानमालेच्या माध्यमातून केली जात आहे. मात्र अशा कार्यक्रमाला रसिक मिळविणे आणि कार्यक्रम यशस्वी करणे ही मोठी जबाबदारी बनली आहे असे प्रतिपादन डॉ. दिलीप पुंडे यांनी वेळी केले. दरम्यान ‘गुरुवर्य गौतमजी बोडके शिक्षणसेवा सन्मान’ जि.प.कें.प्रा.शाळेचे शिक्षक तथा ख्यातनाम बासरीवादक ऐनोद्दीन फक्रोद्दीन वारसी यांना तसेच ‘तुळसीराम अक्षरसन्मान’ प्रणीता पोतदार यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
पुरस्कार प्रदान केल्यानंतर ऐनोद्दीन वारसी यांनी बासरी वादनातून पुरस्काराला उत्तर दिले व मायबोलीचे आभार मानले.
सुप्रसिद्ध ‘ हवा येवू द्या ‘ चित्रपट झेंडा , गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा ‘ या गाजलेल्या चित्रपटात संवाद लेखन म्हणजेच पटकथा लेखन करणारे सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व अरविंद जगताप यांनी उद्घाटनपर भाषण केले . त्यात ते म्हणाले की, महिला वड सावित्री पोर्णिमेला वडाच्या भोवती दोरा बांधून सात जन्म हाच नवरा मिळू दे असे व्रत वैकल्य करतात. त्यापेक्षा महिलांनी असे म्हणायला पाहिजे की, माझ्या नवर्याने लावलेल्याच वडाच्या झाडाची पूजा करीन. असे व्रत केलेतर निदान झाडे लावा ही मोहिम तरी राबविण्यास मदत होईल. नाहीतर शहरातील स्त्रीयांना कुठे वड पुजायला मिळतो ? अशा अंधश्रध्देतून वडाच्या झाडाच्या फांद्या छाटल्या जातात व त्या तोडून नेलेल्या फांदीची पूजा केली जाते. अशा या खुळचट प्रथा बंद करण्याची खरी गरज आज समाजाला आहे. शिवाजी आंबुलगेकर व सर्व मायबोली गणगोताचे हे कार्य छान चालले आहे. मायबोलीच्या माध्यमातून कला , संस्कृती व मराठी भाषा समृद्धी च्या दृष्टीने केले जाणारे मायबोली साहित्य संवाद यासारखे कार्यक्रम खरोखरच समाजाला दिशा देणारे ठरतील याबद्दल या परिषदेतील पदाधिकार्यांचे कौतुक केले.
अध्यक्षीय समारोपपर भाषणात डॉ. साहेब खंदारे म्हणाले की, जगात जिथे जिथे म्हणून संस्कृती चा उदय झाला तो सर्वत्र केवळ कृषी परंपरेतूनच झाला. या संस्कृतीच्या व्यापक कार्यकल्पात भाषा आणि साहित्याही कला या दोन्ही गोष्टी महत्वाच्या ठरत आल्या आहेत जीवन सुकर करण्यासाठी संवादाचे एक सशक्त माध्यम म्हणून भाषा नेहमीच महत्वाची ठरत आली आहे. वर्तमान जग हे तंत्रज्ञानाने व्यापले गेले आहे. याचा फार मोठा प्रभाव भाषा साहित्यासह अनेक सांस्कृतिक घटकांवर पडत चालला आहे. मोबाईलवर उपलब्ध असलेल्या व्हाटसपीय आणि फेसबुकीय साहित्यिक ‘ अभ्यासक , विचारवंताना विरोध करीत बसण्यापेक्षा याच माध्यमातून साहित्य संपदेला प्रसिद्धी देण्याचे कार्य अपेक्षित आहे. या सर्व अपेक्षांची सुरुवात करणारा एक साहित्यिक वर्ग मायबोली साहित्य संवादाच्या या कार्यक्रमातून प्रेरणा घेवून कार्यरत होईल हीच अपेक्षा. शिवाजी आंबुलगेकर यांनी अतिशय छान सर्व साहित्यिकांना एकत्र आणून हा कार्यक्रम घडवून आणला त्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुक. जोगदंड सरांचे शब्दकोष निर्मितीचे कार्यही कौतुकास्पद आहे.
दुसऱ्या सत्रात ‘कथासंवाद’ झाला. यात सुप्रसिद्ध कथाकार राम तरटे यांनी त्यांची ‘ कंदोरी’ व राजाभाऊ कदम यांनी ‘बाराण्याची बोंब ‘ या वैविध्यपूर्ण बोलीभाषेतील दोन कथा सादर करून रसिकांकडून चांगलीच दाद मिळवली. कथाकथन कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. पंडित शिंदे यांनी खुमासदार शैलीत करून रसिकात चांगलाच हस्यकल्लोळ माजवला. तिसऱ्या सत्रातल्या ‘कविसंवादा’त प्रसिद्ध कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर आणि कवी अमृत तेलंग यांनी आपल्या कविता सादर केल्या. कवींची जडणघडण, निर्मिती प्रक्रिया या संदर्भाने डॉ. केशव खटींग यांनी दोघां कवींना चांगलंच बोलतं केलं व फिरक्या घेतल्या. शेवटच्या कलासंवाद’च्या सत्रात सुप्रसिद्ध बासरीवादक ऐनोद्दीन वारसी यांच्याशी, मायमराठी, या वाहिनीचे संपादक राजेसाहेब कदम व मायबोलीचे संस्थापक सचिव ज्ञानोबा जोगदंड यांनी संवाद साधून कला क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा कल व पालकांची अनुमती किती महत्वाची आहे या गोष्टीविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. याच कार्यक्रमात ऐनोद्दीन वारसी यांनी त्यांच्या शागीर्दांसोबत वेणूनाद सादर केला. त्यात ओल्या वेळूची बासरी , कावळे उडाले स्वामी , चर्चवेल , संध्यासूक्त , मितवा , जोगीया आदी राग गावून रसिकांच्या चांगल्याच टाळ्या मिळवल्या.
मराठीत पहिल्यांदाच अशा प्रकारचा आगळावेगळा साहित्य संवाद हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमा अगोदर साहित्य संवाद म्हणजे काय ? याबदल उत्सुकता होती परंतू कार्यक्रम बघितल्या नंतर मात्र त्यांना खरे स्वरूप कळाले. या कार्यक्रमासाठी दर्दी रसिकांनी मोठ्याप्रमाणावर दाद दिली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. रामकृष्ण बदने , एकनाथ डुमणे यांनी केले तर विविध सत्रातील कार्यक्रमाचे आभार सौ. साधना पेंढारकर ,प्रभा राठोड , संतोष तळेगावे , देविदास टाकळीकर , गजानन गेडेवाड यांनी मानले. या कार्यक्रमासाठी सुर्यमुद्रा प्रकाशक डॉ.श्रीराम गव्हाणे , कवी जगन शेळके , शंकर वाडेवाले , नागोराव उतकर, ऋषिकेश देशमुख, शिवाजी जोगदंड, मोहित काद्री, भगवानराव काळे, मनोहर बसवंते,बाळू डुगडुमवार, रोहिणी पांडे, भगवान आमलापुरे, श्रीनिवास मस्के आदी नांदेड व लातूर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध साहित्यिक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बंडे मंडप डेकोरेशनचे शिवानंद बंडे, जिजाऊ ज्ञानमंदिरचे कार्यवाह जगदीप जोगदंड व संपूर्ण जिजाऊ परिवाराचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व मायबोली गणगोतांनी विशेष परिश्रम घेतले.