
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी – शिवकुमार हिप्परगे
सावरगाव / अहमदपुर : परचंडा गाव हे अहमदपूर तालुक्यातील आदर्श गाव म्हणून निवड झाली आहे या गावातगेल्या दोन वर्षापासून ग्रामविकासाची अनेक कामे करून एक प्रकारचे मॉडेल तयार केले आहे स्वच्छता, पाणी ,प्रकाश ,घनकचराव्यवस्थापन ,सार्वजनिक स्वच्छता ग्रह ,हागणदारीमुक्त गाव ,स्वच्छ परचंडा सुंदर परचंडा, सीसीटीव्ही, साऊंड सिस्टिम दररोज सामूहिक राष्ट्रगीत अशा अनेक बाबतीत विकास साधला आहे.
गावामध्ये पेव्हर ब्लॉग चे काम बऱ्याच अंशी झाल्यामुळे रस्त्याला व गावाला शोभा आली आहे गेल्या दोन-तीन वर्षापासून वृक्षारोपणाची व संवर्धनाचे काम मोठ्या प्रमाणात झाली आहे.घन वनचा प्रकल्प पण राबवण्यात आला आहे सर्व झाडांना ठिबक सिंचन करण्यात आले आहे .तसेच सर्वच झाडांना संरक्षित जाळ्यांचा पण वापर करण्यात आलेला आहे .जि प प्रा शा शाळेमध्ये बालाउप्रमाणंतर्गत अनेक प्रकारची कामे झाली आहेत बोलकी भिंत रंगरंगोटी कमान पाणी स्वच्छताइत्यादी कामे करण्यात आलेली आहेत.प्रत्येक वर्गामध्ये डिजिटल टीव्ही बसवण्यात आली आहे सर्व शाळेचा एरिया सीसीटीव्ही फुटेज मध्ये आणण्यात आलेला आहे.सर्व शाळा सौर ऊर्जावर चालते.
अंगणवाडी पण डिजिटल करण्यात आली आहे. संपूर्ण अंगणवाडी सौरऊर्जेवर चालते अंगणवाडी सीसीटीव्ही,टीव्ही मुलांना खेळण्यासाठी खेळणी रंगरंगोटी करून विकास साधला आहे.गावामध्ये सूक्ष्म नियोजन करून ग्रामविकास साधला आहे.
स्मार्ट ग्राम मध्ये तालुक्यातून पहिला येऊन दहा लाखाचे बक्षीस प्राप्त झाली आहे. हा ग्रामविकास करण्यात परचंडा गावचे सरपंच सौ शिवनंदा हिप्परगे, ग्रामसेवक व्ही. एस. येलगत्ते व सदस्य हे सर्व दिवस रात्र एक करत आहेत.