
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा शहरातील जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज जयंती उत्सव समिती कर्यकरणीची निवड सोमवारी करण्यात आली. त्यात उत्सव समिती अध्यक्षपदी दत्ता शेटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
शहरातील श्रीनिवास मंगल कार्यालयात दि. २७ रोजी सोमवारी जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज जयंती निमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समिती निवडण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदरील बैठकीत सार्वजनिक महात्मा बसवेश्वर महाराज जयंती उत्सव समिती गठीत करण्यात आली. ती पुढील प्रमाणे- अध्यक्ष दत्ता शेटे, स्वागताध्यक्ष- उपनगराध्यक्ष दत्ता वाले, सचिव- मारोती एजगे, कार्याध्यक्ष- सतीष अनेराव, उपाध्यक्ष- दिपक रायफळे, सदानंद धुतमल, त्र्यंबकेश्वर गोरकट्टे, सहसचिव- राजेंद्र नाईकवाडे, संदिप कहाळेकर, कोषाध्यक्ष- बसवेश्वर डोम, अवि होळगे, सहकोषाध्यक्ष- साईनाथ अनेराव, हनमंत आरळे, प्रणव वाले, प्रसिद्धी प्रमुख- गोविंद पवार, शिवराज पाटील पवार, विनोद महाबळे, कैलास कहाळेकर, तुकाराम दाढेल, अनवर पठाण, प्रमोद होळगे, सिध्देश्वर कांजले तर प्रमुख मार्गदर्शक सल्लागार म्हणून नगरसेवक पंचशील कांबळे, मल्लिकार्जुन मटके, हरिभाऊ शेटे, पवन वाले, संजय शेटे, पांडुरंग शेटे, गोविंदराव सोनवळे, शिवसांब बोंडारे, माजी नगरसेवक युवराज वाघमारे आदींची सर्वानुमते निवड करण्यात आली.